पाच दिवस राहणार संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:00:30+5:30

कोरोना विषाणूचा फैलाव आर्वी उपविभागात प्रामुख्याने नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मंगळवारी रात्री बारा वाजेपासून रविवार, १९ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान बँकांत पीककर्ज प्रक्रिया, वैद्यकीय सुविधा, औषधी दुकाने, दूध वितरण, घरपोच सेवा, दूध संकलन, वर्तमानपत्र वितरण या सेवा सुरू राहणार आहेत. संचारबंदीची दोन महिन्यात ही चौथी वेळ आहे.

Curfew will last for five days | पाच दिवस राहणार संचारबंदी

पाच दिवस राहणार संचारबंदी

Next
ठळक मुद्देशासकीय कार्यालये असणार बंद : बँकेत केवळ पीककर्ज प्रक्रिया असेल सुरू

देऊरवाडा/आर्वी : रामदेवबाबा वॉर्डातील युवकाच्या संपर्कातील पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी पाच दिवसांसाठी रविवार, १९ जुलैपर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव आर्वी उपविभागात प्रामुख्याने नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मंगळवारी रात्री बारा वाजेपासून रविवार, १९ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान बँकांत पीककर्ज प्रक्रिया, वैद्यकीय सुविधा, औषधी दुकाने, दूध वितरण, घरपोच सेवा, दूध संकलन, वर्तमानपत्र वितरण या सेवा सुरू राहणार आहेत. संचारबंदीची दोन महिन्यात ही चौथी वेळ आहे.
तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये बुधवारपासून रविवारपर्यंत पूर्णत: बंद राहणार असून शासकीय अधिकाऱ्यांना अत्यावश्यक काम असल्यास केवळ एक किंवा दोन कर्मचारी कार्यालयात बोलावून कामे करायची आहेत. पालिका क्षेत्रातील सर्व बँका कार्यालयीन कामकाज आणि केवळ पीककर्जाकरिता सुरू राहतील. संचारबंदी काळात किराणा दुकानातून घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यात येणार असून किराणा दुकानदार व घरपोच सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना यांना ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. संबंधित किराणा दुकानदाराची नावे व मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Web Title: Curfew will last for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.