शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात बहरली ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती; युवा शेतकऱ्याची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 14:39 IST

सेलूतील युवकाने पारंपारिक शेतीला फाटा देत सेंद्रीय पद्धतीने चक्क विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ ची लागवड केली.

ठळक मुद्देकमी पाण्यात येणारे औषधी गुणधर्म असलेले फळ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च याचा वर्षाअंती हिशोब काढला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे कर्जाचा डोंगर उभा होऊन त्यातून सावरताना नाकीनऊ येतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी सेलूतील युवकाने पारंपारिक शेतीला फाटा देत सेंद्रीय पद्धतीने चक्क विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ ची लागवड केली. प्रारंभी त्याला काहींनी वेड्यात काढले पण; वर्षभरानंतरच उत्पादन सुरु झाल्याने या युवकाच्या जिद्दीपुढे टिकाकारांना तोंडावर हात ठेवण्याची वेळ आली.शुभम राजेश्वर दांडेकर, रा. सेलू असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे पवनार शिवारात दोन एकर शेती आहे. येथे त्याने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘ड्रॅगन फ्रुट’ या विदेशी फळझाडांची लागवड केली. एका एजंन्सीच्या माध्यमातून मध्यअमेरिका व वियतनाम या देशातून त्याने २ हजार ८०० रोपटे मागविली. अडीच लाख रुपये खर्चून आणलेल्या या रोपट्यांनी दीड एकरामध्ये १२ बाय ७ अशा अंतरावर लागवड केली. या झाडांच्या वाढीकरिता स्तंभाची (पोल) उभारणी करण्यात आली. एका पोलजवळ चार झाडांची व्यवस्था करुन त्याचे वर्षभर सेंद्रीय पद्धतीने नियोजन केल्याने वर्षभरात फळधारणा होऊन उत्पन्नही सुरु झाले. सध्या कोरोनाकाळात फळाला मोठी मागणी असून नागपूर व वर्धा येथील बाजारपेठेत शेतातूनच विक्री होत आहे.फळाचे गुणधर्म तरी काय?हे ‘ड्रॅगन फ्रुट’ निवडूंग वेल आहे. त्यामुळे कोणत्याही जनावरापासून या पिकाला धोका नाही. याचे उगमस्थान मध्यअमेरीका असून आता उष्ण प्रदेशातही उत्पादन घेतले जाते. झाडीची वेल छत्रीसारखी वाढत असल्याने त्याला द्राक्षासारखा आधार द्यावा लागतो. त्यामुळे शेतामध्ये स्तंभ (पोल) उभारावे लागतात. झाडाचे आयुर्मान २८ ते ३० वर्ष असल्याने दीर्घकालीन उत्पादन मिळते. जुलै ते डिसेंबर या कालावधीत एका झाडाला ५० ते १०० फळ लागतात. यात प्रथिने, स्निग्धपदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्व बी व क असे अन्नघटक असल्याने मधुमेह, कोलेस्टेरॉल, संधिवात, दमा, कर्करोग, डेंग्यू आदी आजारावर गुणकारी आहेत.बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होणार असून शेतीच आपल्यासाठी कायमस्वरुपी पर्याय ठरणार आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ ची लागवड केली आहे. एक वेळा खर्च आणि कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे. काही चुकांमुळे आतापर्यंत १७ लाखांचा खर्च आला पण, वास्तविकत: त्यापेक्षा निम्मे खर्चातच शेती उभी राहू शकते. आजारावर गुणकारी असल्याने आजारी व्यक्तीला ५० रुपयांत तर इतरांना १०० रुपयामध्ये फळविक्री सुरु आहे.

उन्हाळ्यात चिंता नाहीउन्हाळ्यात जलपातळी खोल जात असल्याने सिंचनाचे वांधे होते पण, या पिकांला पाण्याची फारशी गरज नसल्याने उन्हाळ्यात तीन महिने पाण्याशिवाय हे पीक जगू शकतात. उन्हाची तिव्रता वाढल्यास या झाडांवर जाळी टाकवी लागते. या दीड एकरातून पहिल्यावर्षी अडीच लाख, दुसऱ्या वर्षी साडेसहा लाख तर तिसऱ्यावर्षीपासून जवळपास दहा लाखांचे उत्पन्न सहज मिळू शकते, असा विश्वास शुभमने व्यक्त केला आहे.- शुभम दांडेकर, युवा शेतकरी.

टॅग्स :fruitsफळेagricultureशेती