शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने बहरली कपाशीची शेती

By admin | Updated: December 11, 2015 02:51 IST

सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. पूर्णवेळ शेतात राबूनही अपेक्षित उत्पन्न होत नाही.

एकरी २५ क्विंटल कापूस : कृषी तज्ज्ञांसह प्रगतशील शेतकऱ्यांचेही मार्गदर्शनप्रफुल्ल लुंगे सेलूसर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. पूर्णवेळ शेतात राबूनही अपेक्षित उत्पन्न होत नाही. कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढत आहे; पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत तसेच शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत शेती केली तर अपेक्षितच नव्हे तर विक्रमी उत्पादन घेऊन भरघोस नफा मिळविता येतो. हे घोराड येथील गिरीधर वरटकर या युवा शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.गिरीधर वरटकर हे शिक्षक आहे; पण त्यांना शेतीची मनापासून आवड आहे. ते आपल्या शेतात विविध प्रयोग करतात. शेजारच्या शेतकऱ्यांनाही हे प्रयोग पे्ररणादायी ठरावे, हा त्यांचा खराटोप असतो. त्यांनी यंदा दोन एकर शेतात कपाशीची लागवड केली. प्रायोगिक तत्वावर नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला. पट्टा पद्धतीने तीन बाय सहा, अशा पद्धतीने लागवड करून लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने खत दिले. आतापर्यंत खताच्या चार मात्रा झाल्या. किडीचा नायनाट करण्यासाठी कृषी तज्ञांचा सल्ला घेत चार वेळा फवारणी केली. गरजेनुसार पाणी दिले. झाडाची वाढ जोमदार झाल्याने दोन ओळीतील अंतर सहा फुटाचे असताना झाड वाकू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी बांबू लावून तार व दोरीच्या साह्याने झाडांची फांदी बांधली. यामुळे झाड सरळ उभे राहिले. आज या झाडांची उंची साडे पाच ते सहा फुट असून प्रत्येक झाडाला १५० ग्रॅम वजनाच्या वर बोंड आहे. आजपर्यंत साडे बारा क्विंटल प्रती एकर कापूस वेचून झाला आहे. त्यांना एकरी २५ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. दोन एकरात ५० क्विंटल कापूस होईल, असे शेतीला भेट देणाऱ्या कृषीतज्ज्ञांचे मत आहे.कृषी तज्ज्ञांसह वरटकर यांना अंबोडा (यवतमाळ) येथील प्रगतशील शेतकरी अमृत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनीही पिकांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.