शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

कृषी कार्यालयाला भुईमुगाच्या पिकाचे तोरण

By admin | Updated: May 26, 2016 00:25 IST

शेतकऱ्यांना कृषी विभागाने भुईमुगाचे बियाणे दिले. अन्य वाणाची मागणी होत असताना कृषी विभागाने भलतेच बियाणे दिले.

अंतोरा येथील शेतकऱ्यांचे आंदोलन : चार दिवसांचा अल्टीमेटमवर्धा : शेतकऱ्यांना कृषी विभागाने भुईमुगाचे बियाणे दिले. अन्य वाणाची मागणी होत असताना कृषी विभागाने भलतेच बियाणे दिले. या बियाण्यांची झाडे वाढली; पण चार महिने लोटूनही शेंगाच आल्या नाही. शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला. यामुळे एकरी ५० हजार रुपये भरपाई देण्याच्या मागणीसाठी बुधवारी अंतोरा येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयाला भुईमुगाच्या झाडांचे तोरण लावले. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून जानेवारी महिन्यात के ६ जातीचे भुईमूग बियाणे दिले. यात लोकवाटा १५०० रुपये भरून ३० किलो बियाणे दिले. पेरणीस १०० ते १२५ दिवसांचा कालावधी लोटूनही शेंगाच आल्या नाही. यामुळे चौकशी करून सात दिवसांत न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा आष्टी तालुका कृषी कार्यालयासमोर शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील, असा इशाराही देण्यात आला. चनशेट्टी यांना निवेदन देताना भाजयुमोचे बाळा जगताप, नितीन कपले, प्रशांत केचे, गजानन आंबेकर, राजेश ठाकरे, विनोद देशमुख, आकाश चौधरी, प्रशांत केचे, प्रशांत पांडे, अजय व नरेंद्र कोहळे, प्रशांत देशमुख, ज्ञानेश्वर केचे, बालू केचे, ठाकरे, तडस यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)शेतकऱ्यांचा एकरी २५ हजारांचा खर्च गेला वायाकृषी विभागाकडून आष्टी तालुक्यातील १७० शेतकऱ्यांना भुईमूग बियाणे देण्यात आले. हे बियाणे उगवले; पण पिकाचा कालावधी लोटूनही शेंगाच लागल्या नाही. यामुळे शेतकऱ्यांचा एकरी २५ हजार रुपयांचा खर्च वाया गेला. शिवाय पिकांचा कालावधीही निघून गेला असून आता खरीप हंगामाची तयार करावी लागणार आहे. यामुळे भरपाई देण्याची मागणी होत आहे.रोजंदारी महिला कामगारांचे धरणे आंदोलनकृषी विभागाच्या फळरोपवाटिका, टीसीडी फार्म व बिजगुणन केंद्रावर कार्यरत कामगार महिलांना नियमित कामे दिली जात नाही. शिवाय वेतनही वेळेवर दिले जात नाही. यामुळे महिलांनी सिटूच्या नेतृत्वात बुधवारी कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.कृषी विभाग वर्धा अंतर्गत तालुका फळरोपवाटिका, टीसीडी फार्म तसेच बिजगुणन केंद्रावर १९८२ ते एप्रिल २०१६ पर्यंत सलग ३० ते ३४ वर्षांपासून रोजंदारी कामगार काही महिला कार्यरत होत्या. दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे जुन्या कामगारांना डावलून नवीन कामगारांना कामावर ठेवले जाते.संबंधित कामगार तालुका फळरोपवाटिका, टीसीडी फार्म व बिजगुणन केंद्र हे कार्यान्वित झाल्यापासून रोजंदारीवर कार्यरत होते. त्यांना प्रारंभी ४ रुपये प्रती दिवस रोज होता. आता १२० रुपयांप्रमाणे मजुरी दिली जात आहे. नवीन निर्णयानुसार ती वाढून १७० रुपये करण्यात आली. याबाबत कृषी विभागाशी चर्चा होऊनही अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही.या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.