शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

मजुरांच्या मानसिकतेचे कापसावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:05 IST

यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे.

ठळक मुद्देदररोज वाढविले जातात भाव : एक क्विंटल कापूस विकल्यानंतर मजुरी कापून मिळते अर्धीच रक्कम

फणिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे. यामुळे कापूस उत्पादक आर्थिक चिंतेत आहे.आर्थिक निकड भागविण्यासाठी आधीच कापूस विकलेले शेतकरी भाववाढीमुळे कपाळावर हात मारून घेत आहे. शेतकºयांच्या श्रमशक्तीवर गब्बर होण्याची संधी मिळाल्याने खासगी व्यापारी आनंदी आहे. यंदा भरपूर पाऊस येईल, हा हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. विदर्भात सरासरीच्या निम्मे पाऊस झाला. विशिष्ट दिवसांनी नियमित पाऊस आल्याने पिकाची चांगली वाढ झाली. यंदा कापसाचे उत्पन्न समाधानकारक होईल, अशी अपेक्षा होती; पण दिवाळीच्या पर्वावर विदर्भात ढगाळी वातावरण व हलक्या पावसामुळे कपाशीचे बुड, बोंडे सडून एकरी २-३ क्विंटलचा फटका बसला. बोंडे परिपक्व होऊन फुटण्याऐवजी दोन कळ्या चांगल्या तर दोन किडग्रस्त फुटत होत्या. शेतकºयांनी हिरवी बोंडे फोडून पाहिली असता प्रत्येक बोंडात शेंदरी बोंडअळी दिसून आली. बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही, हा कंपनीचा दावा खोटा ठरवित विदर्भातील कापूस बोंडअळीने फस्त केला. यामुळे अनेकांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरिवला.काहींनी कापूस वेचण्याचा प्रयत्न केला; पण मजूर १२० रुपये मन प्रमाणे वेचणीस आले. एक दिवस कापूस वेचल्यानंतर मजुरांनी कापूस चिकट आहे, बरोबर निघत नाही व हलका आहे, ही कारणे पूढे करून १५० रुपये भाव द्याल तर उद्या येतो वा येणार नाही, अशी तंबी देणे सुरू केले. शेतकºयांना पर्याय नसल्याने मजुरांना मागेल ती मजुुरी द्यावी लागली. हा कापूस घरी येताच शेतकºयांनी ३५०० ते ४००० रुपयांत खासगी व्यापाºयांना विकला. आता दुसरी व अंतिम वेचणी सुरू आहे. यासाठी मजूर मिळणे कठीण झाले. मजुरांसाठी शेतकरी भटकत आहे; पण मजूर मिळत नाही. कापूस शेतात वाळत आहे. उपलब्ध मजूर २०० रुपये रोज मागत आहे. पूर्वी पायी जाणाºया मजुरांना आता एक किमी अंतरासाठीही वाहनाची व्यवस्था करावी लागते. पूर्वी दलालाशिवाय मजूर येत होते. आता ठेकेदाराशिवाय मजूर मिळत नाही. कामाशिवाय ठेकेदार दररोज शेतकºयांना लुटत आहे. मजूर दररोज भाव वाढविण्याची धमकी देत आहे. मजुरांची चणचण, वेचणीचे न परवडणारे दर व कापसाच्या वजनघटीने शेतकरी त्रस्त आहे. मजुरांची ही मानसिकता शेतकºयांना शेतीपासून परावृत्त करीत आहे. दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असल्याने मजुरांनी शेतकºयांप्रती सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे झाले आहे.वाहन, ठेकेदाराविना मजूर नाहीमजुरीशिवाय दहा मजूर आणण्याचे गाडी भाडे ७०० रुपये व प्रती मजूर २० रुपये ठेकेदाराला हे सर्व पकडून प्रारंभीची कापूस वेचणी प्रती क्विंटल १००० ते १२०० रुपये पडली. आता मजुरांनी दर वाढवित २०० रुपये मागत आहे. यामुळे कापूस वेचणे परवडत नसल्याचे दिसते.

टॅग्स :cottonकापूस