शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या युवतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:47 IST

नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर पतीच्या आजीच्या तेरवी कार्यक्रमादरम्यान पळून गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत वर्धेतील श्रीराम शिवमंदिरात शुक्रवारी विवाह पार पडणार होता.

ठळक मुद्देबोहल्यावर चढण्यापूर्वीच केली पोलिसांनी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर पतीच्या आजीच्या तेरवी कार्यक्रमादरम्यान पळून गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत वर्धेतील श्रीराम शिवमंदिरात शुक्रवारी विवाह पार पडणार होता. रितीरिवाजाने लग्नसोहळा आटोपत नवदाम्पत्याच्या डोक्यावर वऱ्हाड्यांनी अक्षदा टाकल्या; पण त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथकाने विवाह मंडपात येत नवदाम्पत्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस कचेरीत नेले. या प्रकरणी तरूणीच्या पहिल्या पतीच्या तक्रारीवरून नवदाम्पत्याविरूद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, उमेश रामदास भांडेकर रा. जामणी हा ग्रा.पं. कार्यालयात संगणक परिचारक म्हणून कार्यरत आहे. मार्च महिन्यात उमेशचा विवाह नागपूर जिल्ह्यातील बिबी (सावळी) येथील रहिवासी असलेल्या त्याच्या सख्ख्या मामेबहिणीसोबत नोंदणी पद्धतीने पार पडला. यानंतर उमेशच्या आजीचे निधन झाल्याने उमेशची पत्नी वगळता पत्नीकडील कुटुंबीय जामणी येथे तेरवीच्या कार्यक्रमाला आले होते. दरम्यान, उमेशच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत पलायन केले. तेव्हापासून उमेश व त्याची पत्नी यांच्यात कुठलाही संवाद झाला नाही; पण तिने फेसबुकवर टाकलेल्या एका मजकुरावरून उमेशला त्याची पत्नी दुसरे लग्न करीत असल्याचे निदर्शनास आले. सदर लग्न सोहळा वर्धेतच होत असल्याचे लक्षात येताच त्याने थेट पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देत योग्य कारवाई करा, अन्यथा मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेल, असे सांगितले. यानंतर आपला मोबाईल बंद केला. यावरून दामिणी पथकाच्या काळे यांनी आपल्या पथकासह सदर युवकाचा शोध घेत लग्नमंडपात धडक दिली. तेथे आनंदात असलेल्या नवदाम्पत्याला पथकातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले.पूर्वीच्या पतीकडून घटस्पोट न घेता हा विवाह होत असल्याने पोलिसांनी उमेशच्या तक्रारीवरून दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या उमेशच्या पत्नीसह तिच्याशी लग्न करणाऱ्या गांधीनगर येथील राहूल कुनवटकर याच्याविरुद्ध कलम ४९४, ४९५, ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पळून गेल्यानंतर केळझर येथे उरकला विवाहदुसºयांदा लग्न करणाऱ्या उमेशच्या पत्नीने तेरवीच्या कार्यक्रमादरम्यान माहेरून पळ काढल्यानंतर राहूल कुनघटकर याच्याशी केळझर येथे ६ जून रोजी लग्न केले. यानंतर आज रितीरिवाजाने लग्न सोहळ्याचे आयोजन शहरातील श्रीराम शिवमंदिरात केले होते, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पूढे आले आहे.उमेश व राहूल यांच्यासह तरुणीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. शिवाय विचारपूस केली जात आहे. चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल.- चंद्रकांत मदणे, ठाणेदार, शहर पोलीस स्टेशन, वर्धा.समाजात महिला व पुरुषांमध्ये कायद्याचा वचक नाही. आजची ही घटना कायद्याचा गैरवापर करणारीच ठरत आहे.- अनिता ठाकरे, कायदे तज्ज्ञ, वर्धा.मामेभावालाच दिला दगाउमेशचे ज्या मुलीसोबत लग्न झाले, ती त्याची सख्खी मामेबहीण आहे; पण ती पळून गेल्याने त्याच्याही अडचणीत भर पडली होती. तिने आपल्या मामेभावालाच दगा दिल्याचे या प्रकरणात पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस