वेडसर महिलेला लागला लोकमतचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 05:00 AM2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:18+5:30

तालुक्यातील आंजी (अंदोरी) येथील शांताबाई नारायण ठाकरे (७०) असे या महिलेचे नाव. गत काही वर्षांपासून देवळीच्या रस्त्यावर तीचे वास्तव्य दिसत आहे. परिसरातील वाटखेडा चौफुलीपर्यंत कधी पायदळ तर कधी ऑटोरिक्षाने जाऊन तसेच सायंकाळी पुन्हा परत येऊन एखाद्या दुकानाच्या आडोशाने रात्र घालविणे तिचा नित्यक्रम ठरला आहे. मानसिक स्थिती चांगली असल्यावर मराठी भाषेवरील प्रभुत्व आवर्जून लक्षात येते.

The cracked woman started fighting for the referendum | वेडसर महिलेला लागला लोकमतचा लळा

वेडसर महिलेला लागला लोकमतचा लळा

Next
ठळक मुद्देतासन्तास मजकुराची उजळणी : वाचनाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची लोकांत चर्चा

हरिदास ढोक।
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : नित्यनियमाने एक वेडसर महिला स्थानिक बसस्थानक चौकातील पान सेंटरवर येऊन लोकमत पेपरचे जोराने वाचन करीत असते. दररोज घडणाऱ्या घटनांबाबत उपस्थितांना अवगत करीत असते. तिच्या या आगळ्यावेगळ्या व दररोजच्या उपक्रमाची तसेच लोकमत प्रती असलेल्या जिव्हाळ्याची चांगलीच चर्चा होत आहे.
तालुक्यातील आंजी (अंदोरी) येथील शांताबाई नारायण ठाकरे (७०) असे या महिलेचे नाव. गत काही वर्षांपासून देवळीच्या रस्त्यावर तीचे वास्तव्य दिसत आहे. परिसरातील वाटखेडा चौफुलीपर्यंत कधी पायदळ तर कधी ऑटोरिक्षाने जाऊन तसेच सायंकाळी पुन्हा परत येऊन एखाद्या दुकानाच्या आडोशाने रात्र घालविणे तिचा नित्यक्रम ठरला आहे. मानसिक स्थिती चांगली असल्यावर मराठी भाषेवरील प्रभुत्व आवर्जून लक्षात येते. दहावीपर्यंतच शिक्षण तसेच वाचनाची आधीपासूनच गोडी असल्याने तिचा वेडसरपणा याला अडसर ठरला नाही, असेच म्हणावे लागत आहे. पान सेंटरवर केवळ लोकमत वृत्तपत्राची आग्रहाने मागणी करून त्याचे एक तास पर्यंत वाचन तसेच महत्वाच्या बातम्यांची उजळणी करणे तिची हॉबी ठरली आहे. काही वर्षापूर्वी पतीबा मृत्यू झाला. त्यामुळे मुलगा व दोन मुली असा तिचा संसार आहे. मुलाचे आंजी व देवळीत घरदार आहे. शेतीवाडी व कृषिसंबंधित व्यवसाय आहे. परंतु मुलाने अनेकदा आग्रह करूनसुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दररोजची भटकंती हीच तिच्या नशिबाची खऱ्या अर्थाने सवंगडी ठरली आहे. वृत्तपत्रातील बातम्यांच्या वाचनामुळे तिला मिळणारा दिलासा अलौकिक व मनाला समाधान देणारा ठरला आहे.

Web Title: The cracked woman started fighting for the referendum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत