शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

खोकला कमी होईना? तोंडात ज्येष्ठमधाचा तुकडा ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

कुणाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारखा त्रास उद्भवतो. अनेक जण याला आजार समजून डाॅक्टरकडे उपचारासाठी जातात; परंतु हा आजार नसून नैसर्गिक बदल आहे. त्यामुळे आपल्या शरीराला वातावरणाशी जुळवून घेताना थोडा त्रास होतो. शरीराच्या तापमानात वाढ होते, शरीरांचे स्नायू दुखतात व सर्दी-खोकला जाणवतो.  तसेच वातावरण बदलामध्ये टाॅन्सीलचा  त्रास वाढतो, अशा वेळेस बाभळीच्या सालीचा काढा बनवून त्यात काळे मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास टाॅन्सीलचा त्रास कमी होतो.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  वातावरणात होत असलेला बदल आणि व्हायरलमुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखीचे रुग्ण वाढत आहेत. यावरील उपायांसाठी डॉक्टरकडे जाण्यासोबतच  अनेकजण आजीबाईचा बटवा वापरत आहेत. असे असले तरी वातावरणाच्या बदलाचा आरोग्यावर परिणाम होतोच. कुणाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारखा त्रास उद्भवतो.     अनेक जण याला आजार समजून डाॅक्टरकडे उपचारासाठी जातात; परंतु हा आजार नसून नैसर्गिक बदल आहे. त्यामुळे आपल्या शरीराला वातावरणाशी जुळवून घेताना थोडा त्रास होतो. शरीराच्या तापमानात वाढ होते, शरीरांचे स्नायू दुखतात व सर्दी-खोकला जाणवतो.  तसेच वातावरण बदलामध्ये टाॅन्सीलचा  त्रास वाढतो, अशा वेळेस बाभळीच्या सालीचा काढा बनवून त्यात काळे मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास टाॅन्सीलचा त्रास कमी होतो. वातावरण बदलामुळे होणाऱ्या खोकल्याचा त्रास कमी करण्याकरिता ज्येष्ठमधाचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवल्यास खोकल्याचा त्रास होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. एकदा शरीर वातावरणाशी एकरूप झाले की आपोआपच त्रास कमी होतो.  ज्यांच्या शरीरात रोगप्रतीकारक शक्ती कमी असते त्यांच्यावर वातावरणीय बदलाचा परिणाम लवकर होतो.   या त्रासापासून सुटका मिळवायची असल्यास अगदी साध्या उपायांनी आपण यावर मात करू शकतो. याकरिता आपल्या आजीने सांगितलेले उपाय हमखास उपयोगाचे ठरतात. आपल्या स्वयंपाकघरातील अनेक वनस्पतींचा याकरिता उपयोग होतो.अद्रक, हळद, तुळस, काळी मिरी, लवंग, गवती चहा आदी औषधी  पदार्थांचा उपयोग करून सर्दी, ताप, खोकला यावर उपाय करू शकतो.

काय म्हणतात तज्ज्ञ

घरगुती उपायांमुळे साईड इफेक्ट्स होण्याची भीती राहत नाही, असे म्हटले जाते; परंतु खूप दिवसाचा खोकला असेल आणि त्यासाठी घरगुती उपाय करीत असाल तर तो धोकादायक ठरू शकतो. प्रत्येकाची शरीररचना वेगवेगळी असते. आजाराची गंभीरता वेगळी असते. यामुळे कोणत्या घरगुती उपचाराचा फायदा होईल, याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून घ्यायला हवा. यामुळे दुष्परिणाम टाळणे शक्य आहे.- डॉ. पवन भोयर,आयुर्वेदिक तज्ज्ञ

दूध आणि हळद  मुलांना हळदयुक्त दुध दिल्यास त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते व सर्दी, खोकल्यासारखे आजार होत नाहीत. हळद ही अँटिबायोटिक असल्यामुळे शरीरातील अनावश्यक विषाणूंचा नाश करते. म्हणूनच हळदीचे आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे.

आल्याचा चहाआपण चहामध्ये आल्याचा हमखास उपयोग करतो. आले सर्दी खोकला या आजारांवर अत्यंत उपयोगी आहे. आल्यातील औषधीय गुणांमुळे आयुर्वेदात फार महत्त्व आहे. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्यात आल्याचा चहा गुणकारी ठरतो.

तुळशीची पाने आणि मध तुळशीच्या पानांचा रस व मध कफावर अत्यंत गुणकारी आहे. वातावरण बदलामुळे कफ वाढतो. त्यासाठी तुळशीच्या पानांचा रस मधातून घेतल्यास कफ पातळ होऊन आराम मिळतो. तुळसी, आलं आणि मधही एकत्र करुन चाटन दिले जाते.

लिंबू आणी मध कोमट पाण्यातून लिंबूचा रस आणि मध रोज सकाळी घेतल्यास पोटातील इन्फेक्शन दूर होते. पोट साफ होते व लिव्हरसंबंधी तक्रारी दूर होतात. अपचन होणे, पोट साफ न होणे या तक्रारी असल्यास रोज सकाळी कोमट पाण्यात मध, लिंबाचा रस प्यावा.

 

टॅग्स :Healthआरोग्य