ऑनलाईन लोकमतहिंगणघाट : रुईच्या गाठी भरून असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकसह संपूर्ण गाठी जळून भस्मसात झाल्या. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सातेफळ मार्गावर घडली.जाम येथील पीव्ही टेक्सटाईल्स या सूत गिरणीतून रूईच्या गाठी घेऊन साईबाबा ट्रान्सपोर्ट या एजन्सीचा ट्रक क्र. एमएच ३२ बी ४७६९ यवतमाळ येथे जाण्याकरिता निघाला होता. हिंगणघाट येथे आल्यावर ट्रक मालक महादेव चंदेल यांच्या सातेफळ रस्यावरील घरासमोर ट्रक उभा ठेऊन चालक मोहम्मद अली मोहम्मद इब्राहिम रा. संत कबीर वॉर्ड हा जेवण करण्याकरिता घरी गेला. काही वेळाने तो परत आला व यवतमाळ येथे जाण्याकरिता त्याने ट्रक सुरु केला असता मागील बाजूने धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी गाडी बंद करून ट्रकचे क्लिनर चिंतामण कापटे यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. अवघ्या काही वेळातच संपूर्ण ट्रकला आगीने कवेत घेतले. हिंगणघाट अग्निशमनच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे आग लोकवस्तीत पसरली नाही. यामुळे मोठी हानी टळली; पण आगीत संपूर्ण ट्रक व सुमारे २.५ टण रुईच्या गाठी जळून खाक झाल्या. यात मोठे नुकसान झाले असून अंदाज घेणे सुरू आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून जमादार विनोद कांबळे व गजानन जाचक पुढील तपास करीत आहेत.
रूई गाठीच्या उभ्या ट्रकने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:27 IST
रुईच्या गाठी भरून असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकसह संपूर्ण गाठी जळून भस्मसात झाल्या. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सातेफळ मार्गावर घडली.
रूई गाठीच्या उभ्या ट्रकने घेतला पेट
ठळक मुद्देअडीच टन रूई भस्मसात : सातेफळ मार्गावरील घटना