शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या झाल्या वाती अन् सोयाबीनची झाली माती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 16:56 IST

परतीच्या पावसाने झोडपले : वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी तालुक्यांत नुकसान, नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाने कापूस, सोयाबीनच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते, यावर्षी चांगला भाव मिळणार, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र, दोन्ही पिकांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती अशीच काय ते शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची अवस्था आहे. 

सुरुवातीला महागडी खत, बियाणं खरेदी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत ओरदार झालेल्या पावसाने सुरुवातीपासूनच ही पिके पावसाच्या कचाट्यात आली, तरीही शेतकरी उभे राहिले. मात्र, आता सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली सोयाबीन आणि कापलेल्या सोयाबीनच्या सुड्या भिजून गेल्या, तर अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्यातून सोयाबीन काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. वेचणीला आलेल्या कापसाचीही काही वेगळी अवस्था नसल्याचे चित्र आहे. 

कापूस पाण्यामुळे भिजल्याने मोठ नुकसान होत आहे. शेतातून निघणाऱ्या या उत्पादनावर दिवाळी सणाचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतातून उत्पादन निघणार नसल्याने दिवाळी तरी साजरी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. 

पपई उन्मळून पडली, केळीच्या बागेचे नुकसान भिडी : शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसासह गारपिटीने देवळी तालुक्यातील भिंडी, रत्नापूर, हुस्नापूर, वाफगांव, बाभुळगांव, काजळसरा, गणेशपूर, शिरपूर, कोल्हापूर, मलातपूर, खडाँ बोपापूर, शेंदापूर, वाटखेडा, रायपूर येथील शेतकयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आले. भिडी शिवारात बोराच्या आकाराची गारपीट झाली. कपाशीसह सोयाबीन, पपई, केळी पिकाला मोता फटका बसला. फळांची पडझड झाली, तर बागा उन्मळून पडल्या. दरम्यान माजी राज्यमंत्री व आमदार रणजीत कांबळे यांनी नुकसानग्रस्त परिसरात भेट देत पाहणी केली. तसेच विमा अधिकारांसह तह सौलदारांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशित केले. 

आर्वी तालुक्यात सोयाबीन पाण्याखालीआर्वी तालुक्यात शनिवारी झालेल्या परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला. आर्वी तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकयांच्या शेतात पाणी सिरले. नांदूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत जलमय होऊन सोयाबीन पाण्याखाली गेले. तसेच, लाडेगाव परिसरात सोयाबीनच्या गंज्या पाण्याखाली गेल्याचे धडधडीत वास्तव असून, मोठे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :CropपीकCrop Insuranceपीक विमाwardha-acवर्धा