शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकातील ‘ती’ चूक दुरूस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:36 IST

पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख आणि तोरणा किल्ला जिंकल्याचे वर्ष ही माहिती चुकीची असल्याने चूक दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यासाठी क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देक्षत्रिय मराठा परिषदेची मागणी : मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख आणि तोरणा किल्ला जिंकल्याचे वर्ष ही माहिती चुकीची असल्याने चूक दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यासाठी क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.न्यू सरस्वती हाऊस (इंडिया) प्रा. लि. नवी दिल्ली येथील प्रकाशनाने सीबीएसई शाळेच्या अभ्यासक्रमात वर्ग ५ वी च्या मराठी सप्तरंग पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक ११ हा देशातीलच नव्हे, तर जगातील आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६२७ (तारखेनुसार) अशी लिहिलेली आहे. तसेच वयाच्या २० व्या वर्षी तोरणा किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख आहे. वास्तविक या दोन्ही बाबी चुकीच्या आहेत.महाराष्ट्र शासनाच्या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणेद्वारे प्रकाशित वर्ग ४ च्या पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक ४ मधील पान क्रमांक १३ वर आणि वर्ग ७ वी च्या पुस्तकात पाठ क्रमांक ५ पान क्रमांक १९ वर लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती यांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३० अशी नमूद आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३० अशीच जाहीर करण्यात आली आहे. तोरणा किल्ला वयाच्या १६ व्या वर्षी आपल्या सवंगड्यांसह जिंकल्याचा उल्लेख ‘रयतेचा राजा शिवछत्रपती’ लेखक डॉ. पी.एस.जगताप या पुस्तकात पान क्रमांक ४२ वर १६४६ असा उल्लेख आहे. तसेच गुगलवरदेखील हेच वर्ष आहेत. प्रकाशनाने नव्या शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके शाळेला वितरित करून महाराजांचा चुकीचा इतिहास मांडण्याची गंभीर चूक केलेली आहे. शासनाने या पुस्तकांचे वितरण थांबवावे आणि चूक दुरूस्ती करण्यासाठी प्रकाशनाला बाध्य करावे, अशी मागणी परिषदचे अध्यक्ष प्रमोद खंडागळे, उपाध्यक्ष संदीप भांडवलकर, प्रा.सुनील अंभोरे, अ‍ॅड. गजेंद्र जाचक, मनोज चांदूरकर, सुधीर पांगुळ, प्रशांत वाकचौरे, अजय मापारी, दीपक कदम, अर्चित निघडे, नितीन शिंदे, बादल रोकडे, दिलीप इंगळे आदींनी केली आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजEducationशिक्षण