शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : वर्ध्यात आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; प्रशासनात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 13:49 IST

एकाच दिवशी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आल्याने दिवसरात्र प्रभावी उपाययोजना करणा-या प्रशासनात खळबळ उडाली आहे.

वर्धा : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यातही अखेर कोरोनाचा शिरकाव झालाच. एकाच दिवशी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आल्याने दिवसरात्र प्रभावी उपाययोजना करणा-या प्रशासनात खळबळ उडाली आहे. यात एक रुग्ण वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील आहे, तर दुसरा रुग्ण वाशिम जिल्ह्यातील आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या हिवरा (तांडा) येथील एका ३५ वर्षीय महिला मृत्युपश्चात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले.या महिलेला दम्याचा आजार असल्याने आर्वीतील तिने खासगी रुग्णालयासह सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले होते. ८ मे रोजी सावंगी रुग्णालयात तिचा स्त्राव नमुना तपासणीकरिता पाठविण्यात आला होता. रुग्णालयातून सुटी घेऊन गेलेल्या या महिलेचा मृत्यू झाला असून आज तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वर्धा जिल्हाही कोरोनाबाधितांच्या यादीत आला. प्रशासनाकडून तत्काळ दखल घेत हिंवरा (तांडा) हे गाव सील करण्यात आले. सोबत आर्वी येथील खासगी रुग्णालयही सील करण्यात आले असून या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. तर दुसरा रुग्ण हा वाशिम जिल्ह्यातील असून तो शनिवारी सावंगी येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आला आहे. त्याची तपासणी केल्यानंतर तो कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता कोविड रुग्णालय असलेल्या सेवाग्राम रुग्णालयात त्याला दाखल केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.-------------------जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) या गावात एक ३५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण, ती महिला मृत पावली असून त्या गावाचा परिसर सील केला आहे. तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेतला असून अद्याप एकही व्यक्ती आढळून आला नाही. आरोग्य विभागाकडून सखोल तपासणी सुरू आहे.डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस