शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गुडगाव येथील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 16:14 IST

9 जूनला सामान्य रुग्णालयात  त्यांचा घशातील स्त्राव घेऊन कोरोना तपासणीला पाठविण्यात आला होता.

वर्धा : दत्तपुर येथे सौरऊर्जेवर प्रकल्प  उभारण्यासाठी आलेले गुडगाव येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सेवाग्राम येथे मृत्यू झाला.दत्तपुर येथे महारोगी सेवा संस्थेच्या परिसरात सोलर एनर्जीवर आधारित प्रकल्प उभारणीसाठी  5 जूनला गुडगाव येथून 65 वर्षीय पुरुष पत्नीसोबत कारने वर्धेत आले होते. त्यांना 6 जूनला दत्तपुर येथील विश्राम गृहात विलगीकरण करण्यात आले.  

9 जूनला सामान्य रुग्णालयात  त्यांचा घशातील स्त्राव घेऊन कोरोना तपासणीला पाठविण्यात आला होता.  11 जूनला  रात्री त्यांना जास्त त्रास झाल्यामुळे 1 वाजता रुग्णवाहिकेने सेवाग्राम येथे भरती करण्यात आले होते. 12 जुनला त्यांचा  स्त्राव तपासणी अहवालात  त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालायत उपचार सुरू होते.  

मधुमेह आणि उच्च राकदाब या दोन व्याधी असल्यामुळे  सुरुवातीपासूनच त्यांना अति दक्षता वार्डमध्ये   व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. 15 दिवस त्यांच्या प्रकृतीत चढउतार सुरू होते. तथापि परवापासून त्यांनी  औषधोपचाराला प्रतिसाद देणे  कमी केले होते. अखेर आज सकाळी 10 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वर्धा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.    त्यांच्यासोबत असलेली पत्नी आणि नंतर आलेला मुलगा यांचा अहवाल मात्र कोरोना करिता निगेटिव्ह आला होता.  मुळचे मुंबईचे येथील रहिवासी बेस्ट कंपनीत त्यांनी  इंजिनियर म्हणून नोकरी केली होती. 2013 मध्ये ते दोन मुलांसोबत गुडगाव येथे वास्तव्यास गेले.सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने त्यांनी दत्तपुर येथे स्व खर्चांने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र दुर्दैवाने त्यांचे हे स्वप्न अर्धवट राहिले आणि  त्यांनीं वर्धेत शेवटचा श्वास घेतला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस