शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : वर्धा जिल्ह्यात ४ हजार ५०० रेमडेसिवीर शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 18:03 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : रेमडेसिवीरचा काळा बाजार किंवा साठा करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

वर्धा - कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात पुरेसा साठा असून प्रत्येक कोविड रुग्णालयाच्या मागणीनुसार त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन वितरित करण्यात येत आहे. रेमडेसिवीरचा काळा बाजार किंवा साठा करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. रेमडेसिवीरचा काळा बाजार आणि साठा याला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या निगराणीत रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेत. 

जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णालयात दाखल रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शिफारस केल्यानुसार रेमडेसिवीर इंजेक्शन वितरण जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ६३५ इंजेक्शन प्राप्त झाले होते त्यापैकी ६ हजार १३५ इंजेक्शन वितरित करण्यात आले असून ४ हजार ५०० इंजेक्शन शिल्लक आहेत. 

असे होते वितरण

जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे कोविड रुग्णालयाकडून त्यांच्याकडे दाखल रुग्णनिहाय रुग्णाच्या नावासाहित यादी कळवण्यात येते. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सदर यादी सत्यपित करून ती जिल्हाधिकारी यांच्याकडे शिफारस पाठविण्यात येते. जिल्हाधिकारी रेमडेसिवीर विक्रीची परवानगी असलेल्या जिल्ह्यातील एजन्सीला प्रत्येक रुग्णालयनिहाय किती इंजेक्शन वितरित करायचे याचा लेखी आदेश देतात. त्यानुसार संबंधित एजन्सी त्यांना ठरवून दिलेल्या रुग्णालयाला रेमडेसिवीरचा पुरवठा करते.  

रुग्णालायतील प्राधिकृत व्यक्ती ज्या कोविड रुग्णासाठी इंजेक्शन देणार आहेत त्याचे नाव इंजेक्शनवर लिहून दिले जाते. तसेच इंजेक्शन देऊन झाल्यावर रिकाम्या बाटल्या भरारी पथकांना दाखविणे बंधनकारक केले आहे. 

डॉक्टरांनी रुग्णांना रेमडेसिवीर आणण्यास सांगू नये

बाजारात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे आणि रुग्णालयात दाखल रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायचे असल्यास डॉक्टरांनी ते रुग्णांना आणण्यास सांगू नये. संबंधित रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देणे आवश्यक वाटत असल्यास तसे जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळवावे लेखी रुग्णाच्या नावासहित  कळवावे, त्याची खात्री करून संबंधित रुग्णाला तसे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरwardha-acवर्धा