शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
2
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
3
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
4
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
5
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
7
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
8
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
9
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
10
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
11
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
12
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
13
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
14
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
15
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
16
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
17
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
18
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
19
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
20
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले

समुद्रपुरात कोरोनाची ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 5:00 AM

सदर कोरोनाबाधित महिला नंदोरी येथील नातलगाकडे १२ जुलैला लग्नाकरिता गेली होती. तिथे एक दिवस मुक्काम केला. १७ जुलैला तिची तब्येत बिघडली. २२ जुलैला तिला हिंगणघाट येथील डॉ. मानधनिया यांच्या रूग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. रुग्णाचा रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण वाढलेले होते. भरती केल्यानंतर दोन तासानंतर तिला ताप आला.

ठळक मुद्देमहिला बाधित : कानकाटीत सहा कुटुंबांतील ३९ सदस्य ‘हायरिस्क’मध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जिल्ह्यात एकमेव समुद्र्रपूर तालुका कोरोनामुक्त असतांनाच गुरुवारी संध्याकाळी नऊ वाजता कानकाटी येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने तालुक्यात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला. कानकाटी गावाच्या बाहेरील परिसरात महिलेचे वास्तव्य असल्याने घराचा परिसर प्रशासनाने कन्टटमेंट झोन म्हणून घोषित केला तर खबरदारीचा उपाय म्हणून कानकाटी गावातही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.सदर कोरोनाबाधित महिला नंदोरी येथील नातलगाकडे १२ जुलैला लग्नाकरिता गेली होती. तिथे एक दिवस मुक्काम केला. १७ जुलैला तिची तब्येत बिघडली. २२ जुलैला तिला हिंगणघाट येथील डॉ. मानधनिया यांच्या रूग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. रुग्णाचा रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण वाढलेले होते. भरती केल्यानंतर दोन तासानंतर तिला ताप आला. डॉक्टरांना शंका आल्यानंतर कोरोना चाचणी करण्याकरिता गुरुवारी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांना कळविले. रुग्णाला ह्रदयविकाराचे लक्षण दिसल्याने पुढील उपचार करण्याकरिता डिस्चार्ज देण्यात आला. ह्रदयविकार निदानासाठी नागपूर येथे उपचाराकरिता आणले असता कोरोना चाचणीचा अहवाल न आल्यामुळे तेथील डॉक्टरांनी तिला भरती करण्यास नकार दिला. त्यामुळे महिला व तिचा नातेवाईक घरी परतले. गुरुवारी रात्री नऊ वाजता तिचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याचे कळले. प्रशासनाने तातडीने पावले उचलत तिला सेवाग्रामला भरती केले. शुक्रवारी समुद्र्रपूरचे नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, ठाणेदार हेमंत चांदेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील भगत हे संपूर्ण चमू सह तिथे पोहोचले व नातलगांकडून रुग्णाचा इतिहास जाणून घेतला. एकूण सहा कुटुंबातील ३९ व्यक्ती हायरिस्कमध्ये असून घराचा परिसर कन्टेटमेंट झोन घोषित केला. घरातील इतर व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त न झाल्यामुळे कानकाटी गावात सुद्धा प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ग्रामिण रुग्णालयाचे डॉक्टरांनी हाय रिस्क मधील ३९ संशयितांचे स्वॅब घेतले असून त्याचा अहवाल काय येतो? यांकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.या वेळी प्रभारी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसिलदार हेमंत तायडे, ठाणेदार हेमंत चांदेवार , सरपंच बलराम राऊत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिल भगत, मांडगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शोभा लांजेवार, आरोग्य विस्तार अधिकारी एस एम वानखेडे,मंडळ अधिकारी धर्मेंद्र गायकवाड,तलाठी सुनील जाधव उपस्थित होते. कानकाटीत रूग्ण आढळताच समुद्रपूर तालुक्यात कोरोनाचा प्रवेश झाला. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या