पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस वसाहतीत कोरोनाची ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 05:00 AM2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:00:11+5:30

दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असल्याने प्रशासनही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसून येत आहे. पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी अहोरात्र झटत असतानाच आता पोलिसांनाही कोरोनाने कवेत घेतल्याने सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्यांनाच सुरक्षा प्रदान करण्याची वेळ पोलीस अधीक्षकांसमोर आली आहे.

Corona's 'entry' into police colony with Superintendent of Police's office | पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस वसाहतीत कोरोनाची ‘एन्ट्री’

पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस वसाहतीत कोरोनाची ‘एन्ट्री’

Next
ठळक मुद्देतीन अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचारी पॉझिटिव्ह । उपाययोजनेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही दिवसांपासून जीवाची पर्वा न करता सतत रस्त्यावर उतरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटणाºया पोलीस कर्मचाऱ्यांनाच आता कोरोनाने आपल्या कवेत घेतले असून ३ पोलीस अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात आवश्यक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शिरकाव केला असून अनेक नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असल्याने प्रशासनही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसून येत आहे. पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी अहोरात्र झटत असतानाच आता पोलिसांनाही कोरोनाने कवेत घेतल्याने सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्यांनाच सुरक्षा प्रदान करण्याची वेळ पोलीस अधीक्षकांसमोर आली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या कारचालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
त्यानंतर पोलीस विभागाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली.
विश्वसनीय माहितीनुसार, पुलगाव, दहेगाव, हिंगणघाट आणि रामनगर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील ८ कर्मचारी आणि तीन अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आहे. पोलीस विभागात कोरोनाने एन्ट्री घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गिरडच्या आरोग्य केंद्रातील कर्मचारी पॉझिटिव्ह
गिरड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाने शिरकाव केला असून आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.गिरड येथील आरोग्य केंद्रात कार्यरत ५२ वर्षीय कर्मचाऱ्याला ताप आल्याने त्यांनी कोरोनाची अ‍ॅन्टीजेन चाचणी करुन घेतली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने स्थानिक ग्रामपंचायतीने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेला परिसर सील करुन कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. महत्वाची सेवा वगळता दोन दिवसासांसाठी गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे.

५० कर्मचाऱ्यांचे घेतले स्वॅब
पोलीस कर्मचाऱ्यांसह काही अधिकाºयांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच पोलीस वसाहतीतील काहींना कोरोना झाल्याचे पुढे आल्याने पोलीस विभाग सतर्क झाला आहे. पोलीस विभागातील ५० ते ६० कर्मचारी, अधिकाऱ्यांचे स्वॉब घेण्यात आले असून सेवाग्राम येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

बाहेरून येणाऱ्यांना ‘नो एन्ट्री’
पोलीस अधीक्षक कार्यालयातील काही कर्मचारी, अधिकारी कोरोना बाधित निघाल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागात बाहेरून आलेल्या नागरिकांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. महत्त्वाचे काम असल्यासच फक्त परवानगी घेऊन जावे लागत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील परिसराचे दररोज निर्जंतुकीकरण करणे सुरु असून प्रवेशद्वारावर हॅण्डवॉश आणि तामपान मोजक यंत्राच्या सहाय्याने तापमान मोजूनच प्रवेश दिला जात आहे.

Web Title: Corona's 'entry' into police colony with Superintendent of Police's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.