शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकोप; अंत्यसंस्कारावर पालिकेचे 34.55 लाख खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

कोविड मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने व हा खर्च वर्धा नगरपालिका प्रशासनाला न झेपणारा असल्याने सर्वसंमतीने कोविड मृताच्या कुटुंबियांकडून अंत्यसंस्कारासाठी २ हजार ५०० रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर ७ मे पर्यंत १ हजार ३८२ कोविड मृतांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे या खासगी संस्थेने पालका प्रशासनाकडे देयक सादर केले आहे. या देयकापैकी काही देयक पालिका प्रशासनाने खासगी संस्थेला दिले आहे.

ठळक मुद्देसध्या मोजावे लागताहेत मृताच्या कुटुंबीयांना २ हजार ५०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १० मे रोजी सापडला. त्यानंतर जिल्ह्यातील कोविड बाधितांची तसेच कोविड मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना म्हणजेच ७ मे पर्यंत वर्धा नगरपालिका प्रशासनाने वर्धा येथील वैकुंठधामात तब्बल एक हजार ३८२ कोविड मृतांवर अंत्यसंस्कार केले. यासाठी पालिकेला ३४ लाख ५५ हजारांचा खर्च आला आहे. कोविड मृतांवर अंत्यसंस्कार परवडणारा नसल्याने सध्या कोविड मृताच्या कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कारासाठी २ हजार ५०० रुपये घेतले जात आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा येथील वैकुंठधामाचा कंत्राट एका खासगी संस्थेला देण्यात आला आहे. याच खासगी संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या खासगी संस्थेला एका कोविड बाधितावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका प्रशासनाने सुरूवातीला २ हजार ५०० रुपये देण्याचे निश्चित केले. पण नंतर कोविड मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने व हा खर्च वर्धा नगरपालिका प्रशासनाला न झेपणारा असल्याने सर्वसंमतीने कोविड मृताच्या कुटुंबियांकडून अंत्यसंस्कारासाठी २ हजार ५०० रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर ७ मे पर्यंत १ हजार ३८२ कोविड मृतांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे या खासगी संस्थेने पालका प्रशासनाकडे देयक सादर केले आहे. या देयकापैकी काही देयक पालिका प्रशासनाने खासगी संस्थेला दिले आहे. तर उर्वरित देयक वेळीच दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

एका अंत्यसंस्काराचा खर्च २,५०० वर्धा नगरपालिका प्रशासनाने एका मृत कोविड बाधितावर अंत्यसंस्काराचा खर्च २ हजार ५०० रुपये निश्चित करून त्याच प्रमाणे १ हजार ३८२ मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार केला म्हणून ३४ लाख ५५ हजार रुपये कंत्राट दिलेल्या संस्थेला देण्याचे निश्चित केले आहे. तर मृत कोविड बाधिताच्या कुटुंबियांकडूनही तितकीच रक्कम सध्या घेतली जात आहे.

उपलब्ध होतेय सरणएका मृत कोविड बाधितावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेने नियुक्त केलेली खासगी संस्था साडेसात मन जलावू लाकूड, ५० गोवऱ्या तसेच साडेपाच लिटर डिझेल उपलब्ध करून देते. याच साहित्यासाठी मृत कोविड बाधिताच्या कुटुंबियांकडून पालिकेने दिलेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून २ हजार ५०० रुपये घेतले जात आहे. विशेष म्हणजे याची पावती वैकुंठधामात कार्यरत असलेले कर्मचारी मृत कोविड बाधिताच्या कुटुंबियांना देतात.

१ हजार ३८२ मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार केल्यावर हा खर्च पालिकेला झेपावणारा नसल्याचे लक्षात आल्यावर मृत कोविड बाधिताच्या कुटुंबियांकडून २ हजार ५०० रुपये घेण्याचे सर्वसंमतीने पालिकेने निश्चित केले आहे.- विपीन पालिवाल, मुख्याधिकारी, न.प. वर्धा. 

मृत कोविड बाधितावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वैकुंठधामातच साडेसात मन जलावू लाकूड, ५० गोवऱ्या व साडेपाच लिटर डिझेल उपलब्ध करून दिले जाते. शिवाय कोरोना नियमांचे पालन करून मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार केले जात आहे.- राजेश राजपुरोहित, कर्मचारी, वैकुंठधाम, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू