शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

शासकीय कार्यालयांत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 5:00 AM

नगरपालिकेने शहरात आठ ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन उभारले. पण, या हॅण्डवॉश स्टेशनमध्ये ना पाणी, ना सॅनिटायझर तसेच साधे साबण देखील नाही. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस यंत्रणेने या सर्व उपाययोजना राबविल्या. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना प्रतिबंधक उपाययोजनेकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्दे‘ना हॅण्डवॉश, ना सॅनिटायझर’ : कार्यालयात वाढतेय नागरिकांची गर्दी

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी शासकीय कार्यालयांत आल्यास प्रथम येथे हात धुवावे हा या मागील मुख्य उद्देश होता. सुरुवातीला काही दिवस हा प्रयोग नियमितपणे राबविण्यात आला. नागरिकांनी त्याला प्रतिसादही दिला. मात्र, सोमवारी लोकमतने विविध शासकीय कार्यालयांना भेटी देत तेथील ‘रियालिटी चेक’ केली असता आजघडीला काही कार्यालये वगळता एकाही शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ना हॅण्डवॉश स्टेशन दिसून आले ना सॅनिटायझर ठेवून असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांना अद्यापही कोरोना विषाणू आजाराचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याने हे दुदैवच म्हणावे लागेल.मागील काही महिन्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या १६००च्यावर गेली आहे. असे असताना शासकीय यंत्रणा मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपयायोजना राबविण्यासाठी अकार्यक्षम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धस्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे.नगरपालिकेने शहरात आठ ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन उभारले. पण, या हॅण्डवॉश स्टेशनमध्ये ना पाणी, ना सॅनिटायझर तसेच साधे साबण देखील नाही. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस यंत्रणेने या सर्व उपाययोजना राबविल्या. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना प्रतिबंधक उपाययोजनेकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, विविधा या शासकीय कार्यालयांमध्ये कुठेही हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था नसल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे या कार्यालयांमध्ये शहरातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक विविध महत्त्वाच्या कामांसाठी येतात. परंतु, या कार्यालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडेच दुर्लक्ष होत असल्याने शासकीय यंत्रणेच्या दिव्याखाली अंधार असल्याचे दिसून आले.जिल्हाधिकारी कार्यालय सॅनिटाईज मशीन धूळखात४जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाºयाचा कोरोनाने मृत्यू झाला. पण, तरीदेखील प्रवेशद्वारावर कुठलीही हॅण्डवॉश तसेच सॅनिटायझर ठेवल्याचे दिसून आले नाही. सर्रास नागरिक कार्यालयात जाताना दिसून येत असून उपाययोजना नसल्याने तेथे ठेवलेला सॅनिटाईज कक्षही धूळखात पडून असल्याचे दिसून आले.फक्त पैशांची नासाडीनगर पालिकेने एका चांगल्या उद्देशातून हे हॅण्डवॉश स्टेशन लावले होते. यात शंका नाही, मात्र, त्यांचे या उद्देशाकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची तुटफूट झाली आहे. आठ हजार अंदाजे आठ हजार रुपयांचे प्रत्येकी एक प्रमाणे ६४ हजार रुपये खर्चून शहरात आठ ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन उभारण्यात आले. मात्र, याची अवस्था बिकट असून कुठे टाकीच गायब तर कुठे सॅनिटायझर नाही नळाच्या तोट्या देखील तुटल्याचे दिसून आले. याचा उपयोगच होत नसल्याने हा खर्च व्यर्थ गेला असून फक्त पैशाची नासाडी केल्याचे चित्र आहे.पं.स.च्या प्रवेशद्वारावर केल्या जाते हॅण्ड सॅनिटाईजशहरातील पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली असता कार्यालयाच्या प्रवेशद्वार दोरीने बंद करण्यात आले आहे. तसेच कार्यालयात येणाºया नागरिकांच्या नोंदी घेण्यासह तेथे कार्यरत सुरक्षारक्षकाकडून कार्यालयात येणाऱ्यांचे हॅण्ड सॅनिटाईज करुनच कार्यालयात पाठविल्या जात आहे. तसेच नोंद वहित नोद करुनच पुढे पाठवित असल्याचे कार्यालयात दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या