कोरोना लॉकडाऊनचा ‘आरटीओ’ला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:28+5:30

कोरोना विषाणू संसर्गाचे संक्रमण रोखण्याकरिता देशभरात २२ मार्चपासून चार टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वच ठप्प पडले होते. एरव्ही उपप्रादेशिक परिवहन विभागात वाहन परवाना, नवीन वाहन नोंदणी व इतर कामाकरिता मोठी गर्दी उसळते. वाहन परवान्याकरिता आॅनलाईन परीक्षाही द्यावी लागते. गर्दीमुळे संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन या विभागाचे कामकाज तब्बल तीन महिने बंद होते.

Corona lockdown hits RTO | कोरोना लॉकडाऊनचा ‘आरटीओ’ला फटका

कोरोना लॉकडाऊनचा ‘आरटीओ’ला फटका

Next
ठळक मुद्दे१३४७ वाहनांची नोंदणी : मिळाला ३.१७ कोटींचा महसूल

सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे येथील सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन विभागाचेही कामकाज मागील तीन महिन्यांपासून ठप्प होते. कामकाज सुरू झाल्यानंतर जून महिन्यात ३ कोटी १७ लाखांचा महसूल या विभागाला प्राप्त झाला. एरव्ही इतका महसूल केवळ एका महिन्यातच प्राप्त होतो.
कोरोना विषाणू संसर्गाचे संक्रमण रोखण्याकरिता देशभरात २२ मार्चपासून चार टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वच ठप्प पडले होते. एरव्ही उपप्रादेशिक परिवहन विभागात वाहन परवाना, नवीन वाहन नोंदणी व इतर कामाकरिता मोठी गर्दी उसळते. वाहन परवान्याकरिता ऑनलाईन परीक्षाही द्यावी लागते. गर्दीमुळे संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन या विभागाचे कामकाज तब्बल तीन महिने बंद होते. परिणामी, या काळात सर्वच कामकाज ठप्प पडले होते.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने १ जूनपासून ऑनलाईन वाहन नोंदणी सुरू करण्यात आली.
१ जूनपासून आजपावेतो १ हजार ३४७ दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक वाहनांची विक्री झाली. यामध्ये १ हजार २६५ दुचाकी वाहने, एक चारचाकी वाहतूक वाहन आणि कार व इतर ८१ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. तर बीएस-४ वाहनांची नोंदणी एप्रिलमध्येच झाली. वाहनांच्या विक्रीनंतर नोंदणी, परवाना, वाहन तपासणी आणि दंड आदींच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला ३ कोटी १७ लाखांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम
लॉकडाऊनमुळे वाहन नोंदणीसह परवाने काढणे व इतर सर्वच कामे ठप्प पडल्याने मिळणारा महसूलही बंद झाला. याचाच परिणाम अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही झाला. दोन महिन्यांपासून मोटर वाहन निरीक्षक आणि इतर कर्मचारी वेतनाविना आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा अंमल करण्यात आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाजही ठप्प होते. त्यामुळे या विभागाला दरमहा वाहन नोंदणी, परवाने आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळणाºया महसुलाला मुकावे लागले. एरव्ही केवळ एका महिन्यातच ३ कोटी रुपयांवर महसूल विभागाला प्राप्त होतो.
- विजय तिराणकर, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.

Web Title: Corona lockdown hits RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.