शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
4
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
5
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
6
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
7
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
8
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
9
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
10
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
11
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
12
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
14
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
15
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
16
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
17
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
18
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
19
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..

समुद्रपूरवासीयांना दूषित पाणी

By admin | Updated: March 7, 2017 01:11 IST

येथील वॉर्ड क्रमांक ८, ९, १० व १ मधील नागरिकांच्या नळांना दूषित पाणीपुरवठा होतो.

नागरिक संतप्त : नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीला हारसमुद्रपूर : येथील वॉर्ड क्रमांक ८, ९, १० व १ मधील नागरिकांच्या नळांना दूषित पाणीपुरवठा होतो. त्या पाण्यात जंतु येत आहेत. तसेच पाण्याला फेस येऊन त्याचा दुर्गंधही येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याची माहिती देण्याकरिता येथील संतप्त नागरिक नगराध्यक्षांकडे गेले असता त्या तिथे दिसून आल्या नाहीत. यामुळे संतप्त नागरिकांनी त्यांच्या रिकाम्या खूर्चीला हार घालून निषेध नोंदविला.येथील ग्रामपंचायत नगरपंचायतीत परावर्तीत झाली. यामुळे सुविधा मिळतील अशी येथील नागरिकांची अपेक्षा होती. मात्र येथे असलेल्या असुविधांमुळे आता ग्रामपंचायतच बरी असा सूर उमटताना दिसत आहे. गावात एक ना अनेक समस्या उभ्या आहेत. त्या सोडविण्याकडे येथील पदाधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणी पुरवठासमुद्रपूर : दूषित पाणी पुरवठा होत असलेल्या वॉर्डांना पाणी पुरविणारी पाईपलाईन फुटलेली आहे. यातून रोज शेकडो लीटर पाणी वाया जाते. याच बाबतीत कित्येक तक्रारी नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना केल्या; पण संबंधित नगरसेवकांच्या व प्रशासनाच्या उदासिनतेमुळे कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. यामुळे शेवटी या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी या वॉर्डातील महिला व पुरुषांनी नगरपंचायत कार्यालय गाठले. या नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी व निवेदन स्वीकरण्याकरिता नगराध्यक्ष उपस्थित नव्हत्या. उपनगराध्यक्षांशी त्यांनी संपर्क केला असता मला यायला उशीर लागेल, मी देयकावर स्वाक्षऱ्या करू की लोकांना भेटू असे उत्तर नागरिकांना मिळाले. यामुळे नागरिकांनी जोपर्यंत नगराध्यक्ष येत नाहीत तो पर्यंत आम्ही उठनार नाही, असे म्हणत ठिय्याच दिला. अखेर संतप्त महिलांनी कंटाळून नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीला हार चढवला. उपस्थित उपाध्यक्ष व पाणीपुरवठा सभापतींनी महिलांच्या प्रश्नांना मजूर मिळत नसल्याने कामांना विलंब होतो अशी सारवासारव करणारी उत्तरे दिली. यावेळी नागरिकांनी दिलेले निवेदन पाणीपुरवठा सभापती गजु राऊत व उपनगराध्यक्ष रवी झाडे यांनी स्वीकारले. निवेदनामध्ये नमूद केलेल्या गंभीर समस्यांवर वेळीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे. यावेळी हेमलता रंगारी, श्वेता मांडवकर, योगीता रंगारी, करिश्मा खोब्रागडे, रेखा रामटेके, स्नेहा रंगारी, अशोक डगवार, सूरज खोब्रागड़े, अमोल बनसोड, मोहन महाकाळकर, चेतन गजभिये, दिवाकर रंगारी, अमरिश भोयर आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)पारोधीच्या महिलांचा पाण्याकरिता तहसीलमध्ये ठिय्या समुद्रपूर : तालुक्यातील पारोधी गावातील महिलांनी तीव्र पाणी टंचाईची समस्या सोडविण्याच्या मागणीकरिता सोमवारी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांना गावात येवून समस्या सोडविण्यासाठी बाध्य केले. महिलांच्या या आंदोलनामुळे अधिकारी उद्या मंगळवारी सकाळी गावात जात पाणी टंचाईची पाहणी करणार आहेत. आज लोकशाही दिनी पारोधी गावातील ४०-५० महिलांनी तहसील कार्यालयात जावून पाणी समस्या सोडवावी अशी हाक दिली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या मार्गी काढण्याच्या सूचना केल्याचे तहसीलदारांनी सांगितले. यावेळी माजी पं.स. सदस्याने हापसी माझ्या जागेवर असल्याचे अर्ज बीडीओ, तहसीलदार यांना दिल्याने पाणी टंचाईचा प्रश्न आणखी जटील झाल्याचा आरोप करण्यात आला.