शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

चार ठिकाणी कंटेन्मेंट अन् बफर झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:00 AM

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा, जामखुटा, रोहणा तसेच आष्टी (शहीद) या चार गांवासह त्यांच्या परिसरात केंद्र सरकारच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कंटेन्मेंट व बफर झोन तयार करण्यात आला आहे. या परिसरात नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: प्रतिबंध असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तामुळे या परिसरांना पोलीस छावणीचेच स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देपोलीस छावणीचे स्वरूप : घराबाहेर पडण्यास पूर्णत: प्रतिबंध, संचारबंदीची केली जातेय अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरूवातीला तब्बल दीड महिना ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात मागील १४ दिवसांत एकूण १२ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात वर्धा ३, वाशीम १, अमरावती चार, नवी मुंबई ३, गोरखपूर (उत्तरप्रदेश)च्या एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी वर्धा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर सध्यास्थितीत जीवंत असलेल्या ११ कोविड बाधितांवर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे आणि सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा, जामखुटा, रोहणा तसेच आष्टी (शहीद) या चार गांवासह त्यांच्या परिसरात केंद्र सरकारच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कंटेन्मेंट व बफर झोन तयार करण्यात आला आहे. या परिसरात नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: प्रतिबंध असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तामुळे या परिसरांना पोलीस छावणीचेच स्वरूप आले आहे.ठिकठिकाणी लावले सीसीटीव्हीकोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरात केंद्र सरकारच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कंटेन्मेंट व बफर झोन तयार करण्यात आले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याद्वारे गावांमधील प्रत्येक हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे.कंटेन्मेंट झोन मध्ये १,४३७ व्यक्ती होम क्वारंटाईनआर्वी तालुक्यातील तीन ठिकाणी क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणण्यात आली आहे. या कृती योजनेतील कंटेन्मेंट झोन मध्ये सध्यास्थितीत १ हजार ४३७ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. या व्यक्तींवर आरोग्य विभाग लक्ष ठेऊन असल्याचे आर्वीच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता झोपाटे यांनी सांगितले.आष्टी (शहीद)कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मुंबई येथून आष्टी शहरात दाखल झालेली तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या ११ व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. शिवाय ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला त्या भागात क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणण्यात आली आहे.सदर तरुणीच्या निकट संपर्कात आलेल्या ११ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा प्रथम अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून हे अकराही व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.कंटेन्मेंट झोन मध्ये आष्टी शहरातील वॉर्ड क्रमांक ३, वॉर्ड क्रमांक ४, वॉर्ड क्रमांक ५, वॉर्ड क्रमांक १० चा समावेश आहे.बफर झोन मध्ये वॉर्ड क्रमांक ६, वॉर्ड क्रमांक ८, वॉर्ड क्रमांक ११, वॉर्ड क्रमांक १२, पेठ अहमदपूर, नवीन आष्टीतील वॉर्ड क्रमांक २, वॉर्ड क्रमांक ९ चा समावेश आहे.जामखुटानवी मुंबई येथून जामखुटा येथे आलेल्या एका कुटुंबातील तिघे कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे तेराही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचा प्रथम अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. तर जामखुटा परिसरात केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणण्यात आली आहे.जामखुटा येथे आढळलेल्या तीन कोरोना रुग्णांमध्ये एका अडीच वर्षीय मुलाचा समावेश आहे.४सदर रुग्णांच्या निकट संपर्कातील सहा व्यक्तींचे स्वॅब आरोग्य विभागाकडून प्रयोगशाळेत फेर तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून हे सहाही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले आहे.कंटेन्मेंट झोन मध्ये आर्वी तालुक्यातील जामखुटा, हिवरा, हिवरा तांडा, बेल्हारा, बेल्हारा तांडा, हर्राशी, राजणी, पाचोड, चिंचोली, टिटोणा, बेढोणा, वाढोणा या गावांचा समावेश आहे.बफर झोन मध्ये आर्वी तालुक्यातील अंबाझरी, गुमगाव, लहादेवी, पांजरा, आडेगाव तर कारंजा (घा.) तालुक्यातील धामकुंड, चोपन या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या