भोजनशाळाही होणार : संत सयाजी महाराजांची उपस्थितीवर्धा : नागपूर मार्गावरील श्री संत एकनाथ महाराज देवस्थानच्या सभागृह बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकवर्गणीतून हे बांधकाम होत असून भोजनशाळेचे कामही होणार आहे. कामाची सुरूवात सयाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.देवस्थानाचे माजी संचालक शेषराव देशमुख व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी एकनाथराव धोटे यांच्या स्मृतीत ही वास्तू बांधली जाणार आहे. याप्रसंगी गंगाधरराव धांदे, देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष विनोद चोरडिया, संचालक वासुदेवराव मुडे, वसंत भिसे, सचिव मुरलीधर फाले, ज्योत्सना चोरडीया, निहाल व सारिका देशमुख, अजित धोटे, भानुदास घनोकार, गिरीश काशीकर, गजेंद्र कापडे आदी उपस्थित होते. यावेळी विनोद चोरडिया यांनी मंदिराची पार्श्वभूमी सांगत लोक सहभागातून या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास जाणार असल्याचे सांगितले. धांदे यांनी मंदिराचे महत्त्व विषद केले. सयाजी महाराज यांनी नवरात्रीचे महत्तव सांगत हा संकल्प सर्वांच्या सहकार्याने पूर्णत्वास जाईल, असा विश्वास व्यक्त केला. बांधकामाला मदत करण्याचे आवाहनही केले. आभार फाले यांनी मानले. यावेळी पंकज नरेडी, विनय चोरडिया, चंद्रशेखर भागवतकर, प्रशांत तिडके, विशाल देशमुख, जोतिश मरावी, मदनलाल आदींसह परिसरातील भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाला विपीन चोरडिया, राऊत, हरिश चौधरी, सुरेश जामनकर, अनुराग मिसाळ, अंबाडरे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
लोकवर्गणीतून संत एकनाथ महाराज देवस्थान सभागृहाचे बांधकाम सुरू
By admin | Updated: October 6, 2016 00:43 IST