शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आर्वी उपविभागातील ३३५ विहिरींचे बांधकाम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यांचा समावेश असून, या तिन्ही तालुक्यांतील ३३५ विहिरींचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वाकांशी ठरणाऱ्या या योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष कामांनाही ब्रेक लागला आहे. कोरडवाहू शेतीही सिंचनाखाली यावी या हेतूने, तसेच स्वतंत्र सिंचनव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून शासनाने धडक सिंचन विहीर योजना उपक्रम हाती घेतला.

अमोल सोटेलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शेतकऱ्यांनी तिन्ही हंगामांत विविध पीक घेऊन उत्पन्न दुप्पट करता यावे, या हेतूने शासनाकडून धडक सिंचन विहीर योजना कार्यान्वित करण्यात आली; पण निधीअभावी शासनाची ही योजना पांढरा हत्ती ठरू पाहत आहे. आर्वी उपविभागातील तब्बल ३३५ सिंचन विहिरींचे बांधकाम निधीअभावी अर्धवट असून, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यांचा समावेश असून, या तिन्ही तालुक्यांतील ३३५ विहिरींचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वाकांशी ठरणाऱ्या या योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष कामांनाही ब्रेक लागला आहे. कोरडवाहू शेतीही सिंचनाखाली यावी या हेतूने, तसेच स्वतंत्र सिंचनव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून शासनाने धडक सिंचन विहीर योजना उपक्रम हाती घेतला. आपल्यालाही विहीर मिळेल म्हणून शेतकरीवर्ग समाधानी झाला होता; पण सध्या निधीच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.विशेष म्हणजे, शासनाने टप्प्याटप्प्याने सिंचन विहिरीचे अनुदान वितरित करायला सुरुवात केली होती. मात्र, अलीकडच्या काळात हे सर्व खितपत पडल्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवारीने, सावकाराकडून पैसे आणून बांधकाम केले. मात्र, त्यांना काहीही पैसे मिळालेले नाहीत. परिणामी, अनेक विहिरी अर्धवट स्थितीत आहेत, हे विशेष. 

तिन्ही यंत्रणा आल्या अडचणीत-    धडक सिंचन विहीर बांधकामासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग, अशा तीन स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाकडून निधी प्रलंबित असल्यामुळे या तिन्ही यंत्रणा अडचणीत आलेल्या आहेत.  शेतकरी वारंवार शासकीय कार्यालयाला घिरट्या घालून साहेब निधी कधी येणार, अशी विचारणा करीत असल्यामुळे अधिकारीही निरुत्तर झाले आहेत.

धडक सिंचन विहिरीच्या अर्धवट बांधकामाच्या अनुदानासंदर्भात शासनाकडे मागणीचे प्रस्ताव वारंवार पाठविण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून निधी आला नसल्याने शेतकऱ्यांचे सर्व बांधकाम प्रलंबित आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे; पण निधी कधी येईल, हे निश्चित सांगता येत नाही.- विनीत साबळे, उपविभागीय अभियंता, जि.प. लघुसिंचन, उपविभाग, आर्वी

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प