लोकमत न्यूज नेटवर्केदेवळी : हिपेटायटीस बी इंजेक्शनच्या रिअॅक्शनमुळे मरण पावलेल्या हिमानीच्या देवळी येथील राहत्या घरी खासदार रामदास तडस यांनी भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले. सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये हिमानी मलोंडे ही विद्यार्थिनी बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शिकत होती.नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी रूग्णांचे संपर्कात येत असल्याने त्यांचे आरोग्यावर विपरित परिणाम होवू नये यासाठी सदर इंजेक्शन देण्यात आले होते. या इंजेक्शनमुळे कॉलेजमधील १२ विद्यार्थीनीला रिअॅक्शन आली होती. त्यांनीही रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु हेच इंजेक्शन हिमाणीसाठी काळ ठरल्याचे कुटुंबियांनी सांगितले. दिवाळी सणासाठी नवीन सोफा खरेदी करण्याबाबत तिने आजोबा व वडिलांना सुचविले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी ती घरी परतणार होती. सणाचे पूर्व तयारीसाठी कुटुंबिय तिची वाट पाहत होते. परंतु त्यापुर्वीच घात झाल्याची व्यथा याप्रसंगी नातलगांनी मांडली. याप्रसंगी खासदार रामदास तडस यांच्यासोबत न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, प्राचार्य राहुल चोपडा, सौरभ कडू, उमेश कामडी व पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
हिमानीच्या कुटुंबीयांचे खासदारांकडून सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:54 IST