शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पिकांची लागवड करताना जमिनीचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:57 IST

शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कुठल्या गुणवत्तेची आहे याचा विचार करूनच विविध पिकांची लागवड करावी. शिवाय शेतातील मातीचे परीक्षण करून आवश्यक तितक्याच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले.

ठळक मुद्देज्ञानेश्वर भारती : ‘उन्नत शेती-समुद्ध शेतकरी’ पंधरवडा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कुठल्या गुणवत्तेची आहे याचा विचार करूनच विविध पिकांची लागवड करावी. शिवाय शेतातील मातीचे परीक्षण करून आवश्यक तितक्याच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले.सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून २४ मे ते ७ जून या कालावधीत ‘उन्नत शेती-प्रगत शेतकरी’ हा उपक्रम जिल्ह्यातील कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्या उपक्रमाचा उद्घाटनपर कार्यक्रम रोठा येथे पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समन्वयीत शेतकरी उत्पादक कंपनी वर्धाचे अध्यक्ष नरेंद्र काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महाबीज अकोलाचे विपणन महाव्यवस्थापक रामचंद्र नाके, सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. पी.एस. उंबरकर, कृषी विषय विशेषज्ञ डॉ. रुपेश झाडोदे, महाबीज नागपूरचे विभागीय व्यवस्थापक लिलाधर मेश्राम, केम प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक दिनेश राठोड आदींची उपस्थिती होती.शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘उन्नत शेती-समुद्ध शेतकरी’ हा पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रमुख पिकांकरिता आधुनिक आणि अद्यायावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे. शेतकरी हितार्थ असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे. जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे. बीज प्रक्रियेबाबत विशेष कार्यशाळा आयोजित करणे. पीक विमा योजनेचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कवच देणे. विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. वेळोवेळी योग्य मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांना एम किसान पोर्टलशी जोडणे आदीसाठी जिल्ह्यात सुमारे ४७४ ठिकाणी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मेघा कुमरे, अजय फुलझेले, कवडु साखरकर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Farmerशेतकरी