लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : संविधान ही देशाची मोठी संपत्ती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची आर्थिक, शैक्षणिक स्थिती, सामाजिक रचना, धार्मिक व जातीयव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षितता अशा अनेक बाबींचा अभ्यास करून हा देश सशक्त होईल, असे संविधान दिले. संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकारासाठी लढत असताना नारिकांनी कर्तव्याचेही भान ठेवले पाहिजे, असे मत केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरूज्जीवन मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे यांनी व्यक्त केले.तालुक्यातील ठाणेगाव येथील नवप्रभात विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी गुरूजन आणि पालकांच्या मार्गदर्शनात अभ्यासाला प्राधान्य द्यावे, असेही दिवे यांनी सांगितले. शिवाय नवभारत विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाला स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे २५० पुस्तकांचा संच वाचनालयासाठी देण्याचेही सुधीर दिवे यांनी जाहीर केले. याप्रसंगी उपस्थितांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला स.मा.वि.प्र. मंडळाचे नामदेव खवशी, जि.प. सभापती नीता गजाम, जि.प. सदस्य सरिता गाखरे, शाळेचे संचालक रवी मुन्ने, पं.स. सदस्य पुष्पा चरडे, सरपंच प्रमिला बोरकर, उपसरंच साहेबराव पांडे, प्रा. अरुण फाळके तसेच पालक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
कर्तव्याची जाणीव म्हणजे संविधानाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:27 IST
संविधान ही देशाची मोठी संपत्ती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची आर्थिक, शैक्षणिक स्थिती, सामाजिक रचना, धार्मिक व जातीयव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षितता अशा अनेक बाबींचा अभ्यास करून हा देश सशक्त होईल, असे संविधान दिले.
कर्तव्याची जाणीव म्हणजे संविधानाचा सन्मान
ठळक मुद्देसुधीर दिवे : ग्रंथालयाला देणार २५० पुस्तके