शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Vidhan Sabha Election 2019; वर्धा जिल्ह्यातील बालेकिल्ले वाचविण्यासाठी काँग्रेसचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:02 PM

वर्धा जिल्ह्याला काँग्रेसच्या ब्रिटिशकालीन चळवळीचा मोठा वारसा लाभला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या जिल्ह्याची कायम ओळख राहिली. २०१४ नंतर मात्र भाजपची विजयाची घोडदौड अजूनही थांबलेली नाही.

ठळक मुद्देभाजपाच्या विद्यमान आमदारांसमोर आव्हान कमीदेवळीत युतीकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबाजी भावे यांच्यासह विविध संतांची पावनभूमी असलेला जिल्हा आहे. ब्रिटिशकाळात वर्धा सेवाग्राम येथूनच इंग्रजांविरूद्ध महात्मा गांधींनी रणशिंग फुंकले, त्यामुळे या जिल्ह्याला काँग्रेसच्या ब्रिटिशकालीन चळवळीचा मोठा वारसा लाभला आहे. १९८०-९० च्या दशकापर्यंत या जिल्ह्यात काँग्रेसचे अधिराज्य होते. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या जिल्ह्याची कायम ओळख राहिली. मात्र, १९९० नंतर या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा शिरकाव झाला. आता तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे.२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेतही विधानसभेत आर्वी व देवळी हे गड राखून ठेवण्यात अमर काळे व रणजित कांबळे यशस्वी झालेत. तर हिंगणघाट हा शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करीत समीर कुणावार यांनी भाजपच्या तिकिटावर यश मिळविले. वर्धा मतदार संघात पंकज भोयर यांनी भाजपच्या तिकिटावर आर्श्चयकारक विजय मिळविला. २०१४ नंतर मात्र भाजपची विजयाची घोडदौड अजूनही थांबलेली नाही.ग्रामपंचायतीपासून नगर पंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सेवा सहकारी संस्थांच्याही निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार असून शिवसेना-भाजपची युती होईल, असे चित्र आहे. या युतीत वर्धा, हिंगणघाट व आर्वी या तीन मतदारसंघात भाजप उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. देवळी मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाण्याची शक्यता आहे. आघाडीत देवळी, आर्वी, वर्धा हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे तर हिंगणघाट मतदारसंघ राकाँकडे राहणार आहे. यावेळी विद्यमान काँग्रेस आमदारांसमोर विजयासाठी तुल्यबळ आव्हान निर्माण करण्याचा शिवसेना-भाजपचा प्रयत्न आहे. देवळी मतदारसंघात सेनेसाठी भाजप कंबर कसून असून अलीकडेच शिवसेनेत दाखल झालेले युवा नेते समीर देशमुख यांचे नाव या मतदार संघात उमेदवार म्हणून आघाडीवर आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमर काळे यांच्यासमोर भाजपचे दादाराव केचे यांचे आव्हान राहणार आहे. या मतदार संघात युतीकडून केचे यांच्याशिवाय सुधीर दिवे यांनीही उमेदवारी मागितली आहे. पक्ष कुणाला उमेदवारी देतो, हे लवकरच कळेल. वर्धा मतदार संघात काँग्रेसकडून शेखर शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेससाठी सत्वपरीक्षादेवळी मतदारसंघात गेल्या पाच निवडणुका जिंकणारे काँग्रेसचे माजी मंत्री विद्यमान आमदार रणजित कांबळे यांची या निवडणुकीत सत्वपरीक्षा आहे. चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत प्रभा राव यांच्या खºया वारसदार असलेल्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांना या मतदारसंघात १५ हजारांवर अधिक मतांचा फटका बसला आहे. प्रभा राव यांचा बालेकिल्ला राहिलेल्या या गृह मतदारसंघात चारूलता टोकस माघारणे, ही अतिशय जिव्हारी लागणारी बाब आहे. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत रणजित कांबळे यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांवरही पक्षाची करडी नजर राहणार आहे.देशमुखांचाही नवा वारसदार येणार मैदानातराज्यसभेचे माजी खासदार दिवंगत बापूरावजी देशमुख यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांच्या कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी पुढे नेला. आता या कुटुंबातील तिसºया पिढीचे वारसदार समीर देशमुख यांच्या रूपाने शिवसेनेतून देवळी-पुलगाव मतदारसंघात निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत. कुणबी बहुल मतदार संघ अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात त्यांचा सामना रणजित कांबळेंसोबत आहे. काँग्रेसच्या अनेक पुढाऱ्यांनी पक्ष सोडून दुसरा घरठाव केल्याने देशमुखांचा वारसदार या निवडणुकीत काय इतिहास घडवितो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.वंचित आणि बसपही महत्त्वाचेवर्धा जिल्ह्याच्या राजकारणात बहुजन समाज पक्ष विधानसभा निवडणुकीत अनेकदा निर्णायक ठरला आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत देवळी मतदारसंघात बसप उमेदवाराने २४ हजार ९७३मते घेत तिसरे स्थान पटकाविले तर हिंगणघाट मतदारसंघात २५ हजार १०० मते घेत दुसºया स्थानावर बसपा राहिली. वर्धा मतदारसंघात २२ हजार २८३ तर आर्वी मतदारसंघात ५ हजार ३४८ मते मिळाली होती. त्यामुळे बसपचा फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचा राहणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही या जिल्ह्यात संघटन बांधणीचे काम केल्यामुळे त्यांचेही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत.देवळीवर सर्वांची नजर२००९ च्या निवडणुकीत देवळी विधानसभा मतदार संघात भाजपकडून रामदास तडस तर काँग्रेसकडून रणजित कांबळे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत कांबळे ३ हजार ७५५ मतांनी विजयी झाले. तर २०१४ च्या निवडणुकीत सुरेश वाघमारे भाजप व रणजित कांबळे काँग्रेस यांच्यात लढत झाली. यात अवघ्या ९४३ मतांनी ते निवडून आले. कांबळे यांना पराभूत करण्यासाठी यावेळी भाजप-शिवसेनेने कंबर कसली आहे. खासदार रामदास तडस यांची भूमिका येथे निर्णायक राहणार आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019