शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

काँग्रेस गटनेत्याने ‘रायगड’मध्ये बळकावले दालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून नगरपालिकेची ‘रायगड’ ही आकर्षक इमारत साकार झाली. इमारतीमधील व्यवस्था, सजावट युनिक असून अनेकांना ती भूरळ घालणारीच आहे. नगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्रेसचे पाच असे संख्याबळ आहेत. पालिकेत विरोधी पक्षनेत्याकरिता १३ नगरसेवकाचे संख्याबळ आवश्यक आहे. परंतु हे संख्याबळ कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाहीत.

ठळक मुद्देवर्धा नगरपालिकेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी : इतर गटनेत्यांची सामूहिक व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या कित्येक वर्षापासून जलकुंभाखाली असलेले नगरपालिकेचे कामकाज गुपचूप सुसज्ज अशा ‘रायगड’ इमारतीमध्ये गेले. या ठिकाणी नगराध्यक्ष, उपाध्यक्षांसह अधिकाऱ्यांकरीता वेगळे दालन तयार करण्यात आले. तसेच तीन गटनेत्यांकरिता एका मोठ्या हॉलमध्ये वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली. परंतु पालिकेत संख्याबळ नसतानाही काँग्रेसच्या गटनेत्याने चक्क एका अधिकाऱ्यासाठी राखीव असलेले दालन बळकावले. स्वतंत्र्य दालन मिळविण्याची ही हाव इतर नगरसेवकांना खटकल्याने नाराजी व्यक्त होत आहे.कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून नगरपालिकेची ‘रायगड’ ही आकर्षक इमारत साकार झाली. इमारतीमधील व्यवस्था, सजावट युनिक असून अनेकांना ती भूरळ घालणारीच आहे. नगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्रेसचे पाच असे संख्याबळ आहेत. पालिकेत विरोधी पक्षनेत्याकरिता १३ नगरसेवकाचे संख्याबळ आवश्यक आहे. परंतु हे संख्याबळ कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाहीत. त्यामुळे भाजपाचे गटनेता म्हणून प्रदीप ठाकरे, राष्ट्रवादीचे सोनल ठाकरे आणि काँग्रेसचे नीलेश खोंड यांची सदस्यांनी निवड केली आहे. ‘रायगड’ मध्ये पदाधिकारी व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. विरोधी पक्ष नेता नसल्याने त्यांचे वेगळे दालन न करता तीन गटनेत्यांसाठी एकाच मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली. याच हॉलच्या बाजुला एका अधिकाऱ्यासाठी दालन राखीव ठेवले होते. पण, स्वतंत्र्य दालनाचा मोह आवरला नसल्याने अल्पसंख्याबळ असतानाही काँग्रसचे गटनेता नीलेश खोंड यांनी अधिकाऱ्याच्या राखीव दालनावर अतिक्रमण करुन ते दालन ताब्यात घेतले. याप्रकारामुळे सत्ताधारी आणि दुसऱ्या नंबरचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्येही नाराजीचा सूर आहे. काँग्रेसच्या गटनेत्याला स्वतंत्र दालन मिळते तर आम्हाला का नाही; अशीही चर्चा आता पालिकेत सुरु झाल्याने दालनावरुन वादंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी गप्पचन.प. मध्ये भाजपाकडे संख्याबळ आहे आणि सत्ताही. तरीही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गटनेत्याकरिता एका हॉलमध्ये बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पण, काँग्रेसच्या गटनेत्याने कोणाचीही परवानगी न घेता स्वत: एका अधिकाऱ्यासाठी राखीव असलेल्य दालनात घुसखोरी करुन आपल्या नावाची पाटी लावत कामकाज सुरु केले आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. केवळ पाच नगरसेवकांच्या जोरावर गटनेता झालेला नगरसेवक स्वतंत्र दालन घेऊन शकतो तर मग सत्ता असलेल्या भाजपाच्या आणि त्यांनतर सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीच्या गटनेत्याला स्वतंत्र दालन का नाही? असा प्रश्न आता चर्चीला जात आहे. पण, याबाबत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारीही गप्प असल्याने नगरसेवकांचाही रोष वाढत आहे. आता नगरसेवक काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. 

येत्या काही दिवसावर पालिकेच्या निवडणुका आहे. त्या अनुषंगाने नगरसेवकांशी चर्चा करण्यासाठी स्वतंत्र दालन आवश्यक होते. तिन्ही पक्षाचे गटनेते एकाच ठिकाणी चर्चा कशी करणार? त्यामुळे सुुरुवातीपासून स्वतंत्र दालन मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आता मी माझे स्वतंत्र दालन मिळविले. इतर गटनेत्यांनीही त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन घ्यावे.- नीलेश खोंड,   गटनेता, काँग्रेस, न.प.वर्धा.

 

टॅग्स :congressकाँग्रेसMuncipal Corporationनगर पालिका