शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सेवाग्राम विकास आराखड्यातील कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:43 PM

सेवाग्राम विकास आराखड्यातील टप्पा १ मधील विकास कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत तसेच सभागृहातील विद्युतीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पहिल्या टप्प्यातील कामांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यातील टप्पा १ मधील विकास कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत तसेच सभागृहातील विद्युतीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल. नव्याने गठीत करण्यात आलेल्या सेवाग्राम विकास आराखडा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. या बैठकीला खासदार रामदास तडस, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी एन प्रभू, सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, अडारकर असोसिएट चे वास्तू विशारद अरुण काळे, नीरा अडारकर, उपभियंता वाय.एम. मंत्री, सेवाग्रामच्या सरपंच रोषणा जामलेकर, पवनारचे सरपंच, राजेश्वर गांडोळे उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या कामामध्ये सभागृहाचे बांधकाम, धाम नदी विकास, पाण्याची टाकी, आवारभिंत, वाहनतळ, आदी कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत ,असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे पुढील काम थांबले असल्याचे कार्यकारी अभियंता मंत्री यांनी सांगितले. याबाबत विद्युत विभागाच्या कामाबाबत जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना त्वरित काम पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.यावेळी  टप्पा २ मधील कामांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये यात्री निवास परिसरात कॉटेज, नयी तालीम अभ्यास केंद्र्र व ग्रंथालय, आश्रम परिसरातील जुन्या घरांचे नूतनीकरण, कस्तुरबा चौक ते सेवाग्राम आश्रम रस्त्याची सुधारणा, सेवाग्राम गावातील पायाभूत सुविधा, गांधी चित्र प्रदर्शनीचे बांधकाम, आदी सर्व कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात यावित असेही नवाल यांनी सांगितले. याशिवाय टप्पा ३ व ४ मधील  पवनार येथील इको टुरिझम गार्डन, अण्णा सागर तलाव,  संगीतमय कारंजे आणि लेझर शो या कामांबद्दल चर्चा झाली. मुंबई येथील जे. जे. स्कुल आॅफ आर्टतर्फे तयार करण्यात येत असलेल्या जगातील सर्वात उंच चरख्याबाबत अधिव्याख्याता विजय बोनदर आणि विजय सकपाळ यांनी माहिती दिली.  हा चरखा सभागृहाच्या समोरील भागात बसविण्यात येणार आहे. याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यासाठी सुद्धा  प्रयत्न करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. सेवाग्राम विकास आराखड्यातील सर्व चौकांचे सौंदर्यीकरण गांधीमय स्वरूपात करण्यात यावे. तसेच बाहेरून येणाºया पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटनाची माहिती देण्यासाठी ६ ठिकाणी माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्र वर्धेतील बसस्थानक, वर्धा व सेवाग्राम रेल्वेस्थानक, नागपूर रेल्वेस्थानक, आणि नागपूर विमानतळ येथे उभारण्यात येणार आहे. वर्धेत येणाऱ्या सर्व मार्गावर वर्धा आणि सेवाग्रामची माहिती देणारे माहिती फलक उभारण्यात यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी नीरा अडारकर यांना दिल्यात. या बैठकीला वि. वि पांडे, वसीम खान, कार्यकारी अभियंता एस बी काळे, र. ल डाफणे, नगरसेवक निलेश किटे, बांधकाम सभापती शेख नौशाद आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSewagramसेवाग्राम