सेलडोह-सिंदी मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:12+5:30

राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने होत असल्याची बाब लोकमतने उडेजात आणून दिल्यावर बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या कामाची पाहणी करून सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्याला तसा नोटीसही बजावण्यात आला आहे.

Complete the Seldoh-Sindi route before the monsoon | सेलडोह-सिंदी मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

सेलडोह-सिंदी मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यकारी अभियंत्यांच्या सूचना : कंत्राटदाराची केली कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : वाडी-सेलडोह-सिंदी ते सेवाग्राम या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने होत असल्याची बाब लोकमतने उडेजात आणून दिल्यावर बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या कामाची पाहणी करून सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्याला तसा नोटीसही बजावण्यात आला आहे.
सदर महामार्गाचे काम संथगतीने होत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. ही बाब लोकमतने उजेडात आणताच राष्ट्रीय महामार्गाचे विभागीय कार्यकारी अभियंता एन. व्ही. बोरकर, उपकार्यकारी अभियंता पी. बी. कोंडुलवार, कनिष्ठ अभियंता एन. व्ही. नरुले तसेच ध्रुव कॅन्सलटसीचे जी. के. चोकसे यांनी कंत्राटदार एम. बी. पाटील कंपनीचे भागवत, प्रोजेक्ट मॅनेजर अरुण कुलकर्णी यांना सोबत घेऊन या विकास कामाची पाहणी केली.
सदर पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या हयगय बाबत कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. शिवाय सदर विकास काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विकास कामही युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे सांगितले.

पावसाचे पाणी शेतात न जाण्यासाठी शेताशेजारी नाली खोदा
सेलडोह-सिंदी रस्त्यावरील प्रभाकर कलोडे यांच्या शेतासमोर बांधकाम करण्यात येत असलेल्या पुलाजवळ मुरमाचे ढीग तात्काळ उचलून शेतामध्ये पावसाचे पाणी जाणार नाही यासाठी शेताच्या बाजूने नाली खोदण्याच्या सूचना कंत्राटदाराला यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्यात.

सहावेळा बजावली नोटीस
एम. बी. पाटील या कन्ट्रक्शन कंपनीकडून रस्ता बांधकामाबाबत होत असलेला हलगर्जीपणा लक्षात येताच धु्रव कन्सल्टींग कंपनीच्यावतीने यापूर्वी पाटील कंन्ट्रक्शन कंपनीला सहा वेळा नोटीस बजावण्यात आल्याचे जी. के. चोकसे यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच कामात सुधारणा करण्याचे याप्रसंगी सांगण्यात आले आहे.

अधिग्रहीत जमिनीचा मोबदला देण्यास गती द्या
रस्त्याच्या रुंदीकरणात ज्या शेतकऱ्यांची शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आली आहे. त्या शेतकऱ्यांना तातडीने जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी वेळीच मोजणी करण्यात यावी. तसेच त्यांना जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्याही सूचना यावेळी अधिकाऱ्यांनी केल्या.


अन्यथा काम काढण्यात येईल - कोंडुलवार
एम. बी. पाटील कंट्रक्शन कंपनीच्यावतीने रस्ता बांधकामाबाबतचे निकष न पाळल्या गेल्यास या कंपनीकडून हे काम काढून घेण्यात येईल, असे याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता पी. बी. कोंडुलवार यांनी सांगितले. तसेच कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विविध विषयांची माहिती जाणून घेतली.

Web Title: Complete the Seldoh-Sindi route before the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.