शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

तीनही प्रकरणात पोलिसात तक्रार

By admin | Updated: July 8, 2016 02:06 IST

दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेल्या अनागोंदीमुळे पोलीस प्रशासनाने ४ डिसेंबर २०११ रोजी संबंधितांविरूद्ध भादंविच्या ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

पुलगाव : दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेल्या अनागोंदीमुळे पोलीस प्रशासनाने ४ डिसेंबर २०११ रोजी संबंधितांविरूद्ध भादंविच्या ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी काहींना अटकही करण्यात आली होती; पण पोलीस प्रशासन या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचू शकले नाही. वास्तविक, खरेदी-विक्री करताना दोन्ही बाजूच्या व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयात हजर असतात. अर्जनवीसही हजर असतो आणि आता दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयच म्हणते की, या दस्ताची नोंद कार्यालयाकडून केली नाही. मग, २ मे २००० च्या विक्रीपत्रावर नोंदविण्यात आलेल्या नोंदणी शुल्क ११ हजार २७० रुपयांचे काय वा हे नोंदणीपत्र या कार्यालयात कुणी व कसे आणले, हे गुलदस्त्यात आहे. दुसरे प्रकरण देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील असून या प्रकरणी नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय देवळी येथे करण्यात आली होती. या शेतीच्या खरेदी-विक्री प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची तक्रार चंदा दिलीप चेतवाणी रा. यवतमाळ यांनी देवळी पोलीस ठाण्यात केली होती. विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी वर्धा, फौजदारी तक्रार क्र. १८०/२०१० नुसार गुन्हा क्र. ६५/११ नुसार २१ मे २०११ अन्वये नोंदवून भादंविच्या ४०६, ४१७, ४२०, ४६७, ४७१, २४ व १०९ कलमान्वये ११ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. यात रत्नापूर येथील नऊ, रत्नापूरचे तत्कालीन पटवारी व पुलगाव येथील एका अर्जनवीसाचा समावेश होता. तिसरे प्रकरण पुलगाव नगर पालिकेच्या जागेची परस्पर विक्री प्रकरण असून सर्व्हे क्र. २६१/१ च्या सातबारा नोंदीनुसार ही जागा पुलगाव नगर पालिकेची असताना तिची विक्री एकाने दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करून दिली होती. हे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचले होते. मंत्रालयातील लोकशाही दिन कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी केली. यात ५ नोव्हेंबर २०१२ रोजी नगर पालिकेच्या जागेची विक्री या जागेवर अतिक्रमण केलेल्या व्यक्तीने चक्क दुसऱ्या व्यक्तीला करून दिल्याची बाब पुढे आली. याची पुलगाव दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदही केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने या जागेच्या कागदपत्राची पाहणी केली; मात्र भूमापन क्र. २६१/१ या जागेचा सातबारा पाहता ही जागा पालिकेच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. तत्कालीन दुय्यम निबंधकांनी जागेच्या मालकी हक्काबाबत खात्री करणे गरजेचे होते. या प्रकरणी पुलगावच्या तत्कालीन दुय्यम निबंधकाने कर्तव्यात कसूर केल्याने व बेकायदेशीर पद्धतीने या जागेचा खरेदी-विक्री व्यवहार नोंदविल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट होते, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव नोंदणी महानिरीक्षकाकडे सादर केला. यातून सदर दोषीवर कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात आली होती.(तालुका प्रतिनिधी)