शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त वाहनाला कंटेनरची धडक; वाहन चालक गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

डब्ल्यू. बी. ११ डी. ८६७२ क्रमांकाच्या कंटेनरचा मागील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यानंतर वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहने मध्यरात्री नागपूर-यवतमाळ मार्गावरील नागठाणा शिवारातील अग्निहोत्री कॉलेजसमोर रस्त्याच्या कडेला उभे केले. दरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास भरधाव असलेल्या एम. एच. ०४ के. एफ. ०५३९ क्रमांकाच्या कंटेनरने नादुरुस्त वाहनाला जबर धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : टायर फुटल्याने नादुरुस्त झालेला कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला. याच नादुरुस्त वाहनाला मागाहून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जबर धडक दिली. यात चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात नागपूर-यवतमाळ मार्गावरील नागठाणा शिवारातील अग्निहोत्री महाविद्यालयासमोर मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला.डब्ल्यू. बी. ११ डी. ८६७२ क्रमांकाच्या कंटेनरचा मागील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यानंतर वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहने मध्यरात्री नागपूर-यवतमाळ मार्गावरील नागठाणा शिवारातील अग्निहोत्री कॉलेजसमोर रस्त्याच्या कडेला उभे केले. दरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास भरधाव असलेल्या एम. एच. ०४ के. एफ. ०५३९ क्रमांकाच्या कंटेनरने नादुरुस्त वाहनाला जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की एम. एच. ०४ के. एफ. ०५३९ क्रमांकाच्या कंटेनरचा चालक सुभाष वर्मा रा. जानपूर, उत्तर प्रदेश ह. मु. बुटीबोरी, जि. नागपूर याचा वाहनाच्या कॅबीनमध्ये दबून जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या वाहनातील चालक बिजेश यादव यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी धनाजी जळक, रामदास बिसने, विजय पंचटिके, संजय चाटे, प्रवीण बोबडे, अमोल वानखेडे, प्रशांत वंजारी, श्रावण पवार, स्वप्निल वंजारी यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.वाहनाचा झाला चुराडा-   हा अपघात इतका भीषण होता की, नादुस्त वाहनाला धडक देणाऱ्या वाहनाच्या कॅबीनचा पूर्णपणे चुराडाच झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

 

टॅग्स :Accidentअपघात