शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थंड पाणी जार व्यावसायिकांच्या आठ प्लांटला ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 05:00 IST

या व्यवसायांवर अनेकांचे भरणपोषण असल्याने त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित दोन्ही विभागाचा नाहरकत परवाना काढण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा परवाना मिळत नसल्याची तक्रार या व्यावसायिकांची आहे. बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचा आरोप जार व्यावसायिकांनी केला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या आग्रहावरून या व्यावसायिकांनी कोरोना संक्रमण काळात घरोघरी जावून पाणी पुरवठा केला. 

ठळक मुद्देन.प.ची कारवाई : भूजल प्राधिकरण व अन्न प्रशासनाचा परवानाच नाही

 लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : विनापरवाना थंड पाणी जार पुरवित असल्याचा ठपका ठेवनू देवळी नगर पालिकेने येथील आठ व्यावसायिकांचे प्लांट सील केले आहे. भूजल प्राधिकरण व अन्न व औषध प्रशासनाच्या निर्देशानुसार संबंधित प्लांट बंद करण्यात आले. घरोघरी थंड पाणी पुरविण्याची व्यवस्था अचानक बंद झाल्यामुळे नागरी वस्तीतील व्यावसायिक तसेच औद्योगिक परिसरातील कारखान्यात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांची गैरसोय झाली आहे.थंड पाणी जारचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. त्यांच्याकडे व्यवसायाकरिता भूजल प्राधिकरण तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र असने बंधनकारक आहे. त्यामुळे नगरपालिकेने याबाबत तपासणी करुन संबंधित विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र नसल्याने आठ प्लांट बंद केले. यामध्ये दीपक घोडे, राम अंबुरे, अमोल फटींग, सलीम कुरेशी, सुभाष वालदे, विलास वानखेडे, गुणवंत वरके व दत्ता गाडेकर आदी व्यावसायिकांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सर्व व्यावसायिकांवर बेकारीची कुºहाड ओढावली आहे. अनेकांनी पाच लाखाच्या स्वखर्चातून तसेच बँकाकडून कर्ज घेवून हा व्यवसाय उभारला आहे. अ‍ॅक्वा गाड्यांची खरेदी करून व्यवसायाला गती दिली आहे. या व्यवसायांवर अनेकांचे भरणपोषण असल्याने त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित दोन्ही विभागाचा नाहरकत परवाना काढण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा परवाना मिळत नसल्याची तक्रार या व्यावसायिकांची आहे. बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचा आरोप जार व्यावसायिकांनी केला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या आग्रहावरून या व्यावसायिकांनी कोरोना संक्रमण काळात घरोघरी जावून पाणी पुरवठा केला. त्यामुळे शासनाने व्यवसाय बंद करण्याचे दिलेले निर्देश अन्यायकारी व सुशिक्षित बेरोजगाराची रोजीरोटी काढणारे ठरले आहे. भूजन प्राधिकरण तसेच अन्न व औषध प्रशासनाचा नाहरकत परवाना देवून हा व्यवसाय पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी