शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

साथरोग बळावताहेत; प्रतिबंधक उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

हा डास दोरी, लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदींसह लोंबकळणाऱ्या वस्तुंवर विश्रांती घेत असतो. या डासाची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध होताच पुन्हा अळी तयार होऊन याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. याची लागण झाल्यास रुग्ण दगावण्याचीही शक्यता अधिक प्रमाणात असते.

ठळक मुद्देडॉ. सचिन ओंबासे : ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिवांना पत्राद्वारे दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागामध्ये साथरोगाचे प्रमाण वाढले असून डेंग्यूचेही रुग्ण आढळून आले आहे. तेव्हा या आजाराने आणखी पाय पसरण्यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच व सचिवांना दिल्या आहे. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनही कामाला लागले आहे.जिल्ह्यातील काही भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार असून एडीस डासाच्या मादीपासून याचा प्रसार होतो. हा डास घरात किंवा घराभोवती साठवलेल्या पाण्यात वाढतो.पाणी साठविलेली उघडी भांडी, रांजण, ड्रम, घराभोवती पडलेल्या निरुपयोगी वस्तू, खराब टायर्स, नारळाच्या क रवंट्या, प्लास्टिक बाटल्या, बाटल्यांची टोपणे, चहाचे डिस्पोजेबल कप, डबे, कुंड्या, जुन्या पध्दतीचे कुलर्स इत्यादी ठिकाणी आढळून येतो. हा डास दोरी, लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदींसह लोंबकळणाऱ्या वस्तुंवर विश्रांती घेत असतो. या डासाची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध होताच पुन्हा अळी तयार होऊन याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. याची लागण झाल्यास रुग्ण दगावण्याचीही शक्यता अधिक प्रमाणात असते. त्यामुळे डासांचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्याकरिता दक्षता व स्वच्छता हीच उपाययोजना असून सर्व ग्रामपंचायतीसह नागरिकांनीही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्राव्दारे कळविले आहे.ग्रामीण भागात सर्व उपाययोजना करतांना गावकऱ्यांना यासंदर्भात अवगत करावे व अंमलबजावणी करुन त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहे.या उपाययोजना राबविण्यास झाली सुरुवातपरिसर स्वच्छ करावा तसेच पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू ठेऊ नये. डेंग्यूचा डास हा दिवसा चावणारा असल्याने दिवसभर अंगभर कपडे घालावे. पाण्याची भांडी झाकून ठेवावी. घरातील टाक्यांना झाकणे बसवावीत. शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी. आठवड्यात दर शनिवारला कोरडा दिवस पाळावा.परिसरातील डबकी वाहती करावी किंवा बुजवावी. मोठ्या डबक्यात डास भक्षक गप्पी मासे सोडावेत, साचलेल्या पाण्यात क्रुड आॅईल किंवा रॉकेल टाकावेत. गावातील शेणखताच्या ढिगाºयाचे योग्य व्यवस्थापन करावे, शक्य होत असल्यास गावापासून ५०० मीटर अंतरावर हलवावे व प्रत्येक गावामध्ये डासांची घनता कमी करण्यासाठी नियमीत धुरळणी करावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सgram panchayatग्राम पंचायत