शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गाठे प्रकरणाची बंदद्वार चौकशी पूर्ण; चौकशीचा अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 17:14 IST

Wardha : जिल्हा शल्यचिकित्सकांना अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल वानखेडे यांना बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय गाठे यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पाच सदस्यीय चौकशी समितीने शुक्रवारी, २२ नोव्हेंबर रोजी बालरोग विभाग गाठून वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. बंदद्वार चौकशी सुरू असतानाच बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे यांचा पारा वाढल्याचेही सांगण्यात आले. बंदद्वार चौकशीचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आला आहे. 

कारणे दाखवा नोटीस देण्याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. या चौकशी समितीच्या अध्यक्षांसह तीन सदस्यांनी शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग विभाग गाठून बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय गाठे व त्यांच्या अधिनस्त येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले; पण चौकशी सुरू असतानाच चौकशी समितीद्वारे विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. गाठे यांचा पारा चांगलाच वाढला होता. अशाही परिस्थितीत चौकशी समितीतील अधिकाऱ्यांनी बालरोग विभागाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या महिला-पुरुष वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

विद्या पवार यांची चौकशीत गैरहजेरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून प्रारंभी तीन तर नंतर पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली. पाच सदस्यीय चौकशी समितीत अध्यक्ष म्हणून देवळीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष लांडे तर सदस्य म्हणून प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. मनीषा नासरे, नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. मनोज सक्तेपार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पवार, सहायक अधीक्षक पी. एस. वडणारे यांचा समावेश आहे; पण शुक्रवारी प्रत्यक्ष चौकशीच्या वेळी डॉ. विद्या पवार (सोनवणे) या गैरहजर राहिल्याची माहिती आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा