शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

वाळू घाट बंद; पण माफियांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:00 IST

यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव हरित लवादाची स्थगिती व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे सध्या करण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देबांधकाम करणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांना धरले जातेय वेठीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव हरित लवादाची स्थगिती व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे सध्या करण्यात आलेला नाही. असे असले तरी जिल्ह्यातील नदींसह नाल्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध खनन करीत वाळूची उचल करून ती चढ्या दरात बांधकाम करणाºया नागरिकांना विकली जात आहे. याकडे जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयासह महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू घाट बंद असतानाही सध्या वाळू माफियांची चांदीच होत असल्याचे दिसून येत आहे.वर्धा जिल्ह्यातील गत वर्षी लिलाव झालेल्या वाळू घाटांची मुदत ३० सप्टेंबरलाच संपली. मुदत संपल्यानंतर जिल्हा खनिकर्म कार्यालयाने सदर घाट आपल्या ताब्यात घेतले. परंतु, जिल्ह्यातील नदी आणि नाल्यांच्या पात्रातून दिवसाला व रात्रीला अवैध पद्धतीने वाळूचे उत्खनन करून सदर वाळू घर किंवा व्यावसायिक प्रतिष्ठान बांधत असलेल्या नागरिकांना वाळू माफियांकडून चढ्या दरात विक्री केली जात आहे. इतकेच नव्हे तर नदीपात्रातून वाळूची चोरी करणे व त्याची चढ्या दराने विक्री करणे यासाठी वाळू माफियांमध्येच सध्या स्पर्धा लागली आहे. कारवाई करणाºया अधिकाºयांनाच हाताशी घेवून हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा सध्या वाळू माफियांमध्ये होत आहे. सध्या तीन चाकी मालवाहू द्वारे सुमारे २ हजार ८०० रुपयात ४८ फुट वाळू, ट्रॅक्टरद्वारे १५० फुट वाळू १२ ते १३ हजारांमध्ये तर ३२५ फुट वाळू १८ हजार रुपयांमध्ये वाळू माफियांकडून नागरिकांना विकली जात आहे. हा प्रकार सध्या केवळ वर्धा शहरात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. परंतु, कारवाईची जबाबदारी असलेल्या महसूल, उपप्रादेशिक परिवहन व पोलीस विभाग बघ्याचीच भूमिका घेत असल्याने सुजान नागरिकांकडून त्यांच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उल्लेखनिय म्हणजे या गोरखधंद्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.‘ते’ पथक थंडबस्त्यातवाळू चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या कार्यकाळात पोलीस व महसूल विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. परंतु, सध्या स्थितीत हे पथक थंडबस्त्यात असल्याची चर्चा होत आहे.गत वर्षी झाला होता दहा घाटांचा लिलावमागील वर्षी जिल्ह्यातील दहा वाळू घाटांचा लिलाव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म विभागाच्यावतीने करण्यात आला होता. त्या लिलावाची मुदत ३० सप्टेंबरलाच संपल्याने सदर वाळू घाटांचा ताबा सध्या जिल्हा खनिकर्म विभागाने घेतला आहे. असे असले तरी वाळू घाटाचा लिलाव घेणाऱ्यांकडून नियमांना फाटा देत बोटीच्या सहाय्याने वाळूचा उपसा करण्यात आला होता. त्याबाबतच्या काही कारवाईही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याची नोंद संबंधितांनी घेतली आहे. वाळू घाटाचा लिलाव घेणाºयांकडून विविध नियम पाळलेच गेले पाहिजे, यासाठी संबंधिकांकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. तशी मागणीही सुजान नागरिकांची आहे.जिल्ह्यासह तालुक्याची समिती नावालाच?वाळू माफिया आपले पायमुळ घट करू नयेत, लिलाव झालेल्या वाळू घाटांमधून नियमांना अनुसरूनच वाळूचा उपसा व्हावा या हेतूने जिल्ह्यासह महसूल विभाग, तालुका, मंडळ आणि गाव पातळीवर विविध दक्षता समिती तयार करण्यात येतात. परंतु, या समित्या केवळ नावालाच राहत असल्याची चर्चा होत आहे. प्रमुख १२ समित्यांमध्ये पोलीस, महसूल व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी असतात हे विशेष.या अवैध खननला अभय कुणाचे?सेलू तालुक्यातील सुरगाव येथील सुर नदी पात्रात वाळू माफियांकडून दिवसाला झुडपांचा आडोसा घेत वाळूचे ढिग करून ठेवले जात आहेत. इतकेच नव्हे तर ढिग करून ठेवलेल्या वाळूची रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक केली जात आहे. हा संपूर्ण प्रकार वाळू माफियांच्या मनमर्जीने सुरू असून एक ट्रॅक्टर रात्रभऱ्यात तीन फेरी पूर्ण करीत असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर खात्रिदायक सूत्रांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे या संपूर्ण प्रकाराची संबंधितांकडे काही सुजान नागरिकांनी तक्रार केली. परंतु, कारवाई करण्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुर नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध खननाला अभय कुणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मागील वर्षी दहा वाळू घाटांचा लिलाव झाला होता. त्याची मुदत ३० सप्टेंबरला संपली असून त्या वाळू घाटांचा ताबा आम्ही घेतला आहे. वाळू माफियांच्या गोरखधंद्याला आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरीय पथकासह आठही तालुक्यात विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने वाळू घाट लिलावा संदर्भातील स्थगिती ७ डिसेंबरला हटविली आहे. वाळू घाटांचा लिलाव व्हावा यासाठी आम्ही सध्या संपूर्ण प्रक्रिया करीत आहो. परंतु, सध्या हरित लवासाच्या स्थगितीमुळे प्रत्यक्ष वाळू घाटांचा लिलाव होणे बाकी आहे.- इमरान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.