शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा

By admin | Updated: March 12, 2017 00:36 IST

सणांच्या दिवसांत जीवनोपयोगी वस्तूंचा ‘शॉर्टेज’ ही समस्या नेहमीचीच झाली आहे. हा प्रकार स्वस्त धान्य आणि सिलिंडरबाबतच नेहमी घडत आल्याने

सणाच्या दिवसांत कसरत : कामे सोडून रांगेत उभे राहण्याची वेळ वर्धा : सणांच्या दिवसांत जीवनोपयोगी वस्तूंचा ‘शॉर्टेज’ ही समस्या नेहमीचीच झाली आहे. हा प्रकार स्वस्त धान्य आणि सिलिंडरबाबतच नेहमी घडत आल्याने नागरिकांतही रोष असतो. आताही दोनपैकी एका गॅस कंपनीच्या सिलिंडरचा शॉर्टेज निर्माण झाल्याने नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहे. सणांच्या दिवसांतही सिलिंडरसाठी कसरत करावी लागत असल्याचेच दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या इण्डेन गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे. बहुतांश वितरकांच्या कार्यालयात नागरिकांच्या रांगा पाहावयास मिळत आहे. मागणीनुसार सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने वितरकांच्या घरपोच सिलिंडर वितरण व्यवस्थेला चपराक बसली आहे. नागरिकांना सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने ते थेट वितरकांच्या कार्यालयातच सिलिंडर घेऊन पोहोचताना दिसून येत आहे. सध्या ‘स्टॉक’ नसल्याने काहींनी तर तत्सम फलकच लावल्याचे दिसून येत आहे. पुलगाव येथील दोन गॅस वितरकांकडे ग्राहकांच्या रांगा दिसतात तर वर्धा शहरातील एका वितरकाकडे स्टॉकच नसल्याने तत्सम फलक लावल्याचे दिसून आले. नेमके सणांच्या दिवसांतच हे प्रकार घडत असल्याने रोष व्यक्त होत आहे. ही बाब जाणीवपूर्वक केली जात असल्याचेही नागरिक बोलून दाखवितात. एचपी गॅस सिलिंडरबाबत आसिफ जाहीद यांना विचारणा केली असता सिलिंडरचा मुबलक साठा असून सणांचे दिवस असल्याने रविवारीही सुरू ठेवणार आहे. कुठेही तुटवडा नाही, असे त्यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)