शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सीमेवरील बीअर बार बंदने मद्यपींच्या खिशाला चटका

By admin | Updated: April 10, 2017 01:29 IST

राज्य मार्गावरील ५०० मिटर अंतरातील दारूची दुकाने, बिअर बार बंद करण्यात आल्यानंतर दारूबंदी असलेल्या वर्धा

छुपी विक्री करणाऱ्यांकडून दारूच्या किमतीत घसघशीत वाढ : ५० रुपयांची देशी दारू झाली शंभर रुपयांची वर्धा : राज्य मार्गावरील ५०० मिटर अंतरातील दारूची दुकाने, बिअर बार बंद करण्यात आल्यानंतर दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील मद्यपींची चांगलीच पंचाईत झाली आहे. जिल्ह्यालगत अमरावती, नागपूर, यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरील दारूची सर्वच दुकाने बंद झाल्याने येथील मद्यपींची घशाची कोरड भागविण्याकरिता भटकंती होताना दिसते. वर्धेतील मद्यपींना अवैधरित्या दारू पुरवठा करणारे विके्रतेही या संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नात आहेत. पहिलेच चढ्या दराने दारू विकणाऱ्या या विक्रेत्यांकडून दारूच्या किमतीत घसघशीत वाढ केल्याची चर्चा असून मद्यपींच्या खिशालाही झळ बसू लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १ एप्रिलपासून राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील सर्व बिअर बार तसेच वाइन शॉप बंद झालेत. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्याने या निर्णयाचा फारसा फरक पडला नसेल, असे सर्वांनाच वाटले असावे; पण राज्य मार्गावरील ५०० मीटर अंतरातील बिअर बार, वाइन शॉप बंद झाल्याने वर्धेतील मद्यपींचीही अडचण झाली आहे. जिल्ह्याची सिमा पार केल्यानंतर अमरावती, नागपूर, यतवमाळ जिल्ह्यातील बिअर बार, वाईन शॉपमध्ये जावून अनेक मद्यपी तृष्णा भागवायचे. नियमीत पिणाऱ्यांसोबतच प्रसंग साजरे करताना पिणारे अशा बिअर बार, वाइन शॉपचा आधार घ्यायचे. पण, आता हे बिअर बार, वाइन शॉप बंद झाल्याने मद्यपींची पंचाईत झाली आहे. त्यांना दारू मिळविण्याकरिता पराकाष्ठा करावी लागत असल्याचे चर्चित आहे. जिल्ह्यात छुप्या, अवैध मागार्ने होणारी दारू विक्री सर्वांनाच परिचित आहे. पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच अनेक ठिकाणी खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचे शहरासह जिल्ह्यात दिसून आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी) अवैध मागार्ने मिळणारी दारू मूळ किमतीच्या दुप्पट जिल्ह्यातील विविध शहरांसोबतच ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गावांमध्येही दारू विक्री होते. मध्यंतरीच्या काळात दारूच्या शिशिच्या मूळ किमतीवर ५० ते ६० रुपयांपर्यंत वरकमाई करणाऱ्यांनी आता दुप्पटच भाव केल्याचे बोलले जाते. राज्य मार्गालगतचे बिअर बार, वाइन शॉप बंद होताच १०० रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आल्याचे सांगितले जाते. देशी दारूच्या शिशीची मूळ किमत ४६ रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. पूर्वी ही शिशी ५० आणि आता १२० ते १६० रुपयांपर्यंत मिळत असल्याचे बोलले जाते. विदेशी पूर्वी दीडशे रुपयांपर्यत आता १८० ते २०० रुपये, तर नामांकीत ब्रॅण्डची पूर्वी २०० मिळणार आता २३० ते २६० रुपये, २८० रुपयात मिळणारी आता ३२० रुपयांपर्यंत तर थंडी बिअर २०० ते २५० रुपयांपर्यंत मिळत असल्याचे सांगितले जाते.