कारंजात ‘स्वच्छता मोहीम’ झाली लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:08 AM2019-01-12T01:08:35+5:302019-01-12T01:09:14+5:30

कोणतीही शासकीय योजना जेव्हा शासनाची न राहता समाजाभिमुख होते, तेव्हा त्या योजनेची फलश्रुती टोकाला पोहोचते आणि योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होते. याच बाबीचा प्रत्यय कारंजा (घा.) नगरपंचायतीने हाती घेतलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाबद्दल आला.

The 'cleanliness campaign' went on in the car | कारंजात ‘स्वच्छता मोहीम’ झाली लोकचळवळ

कारंजात ‘स्वच्छता मोहीम’ झाली लोकचळवळ

Next
ठळक मुद्देसामाजिक संस्था, शाळा सहभागी : नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी घेतला ग्रामस्वच्छतेचा ध्यास

अरूण फाळके।
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : कोणतीही शासकीय योजना जेव्हा शासनाची न राहता समाजाभिमुख होते, तेव्हा त्या योजनेची फलश्रुती टोकाला पोहोचते आणि योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होते. याच बाबीचा प्रत्यय कारंजा (घा.) नगरपंचायतीने हाती घेतलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाबद्दल आला. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या अथक प्रयत्नातून आणि कल्पकतेतून सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली कारंजा शहर स्वच्छता मोहीम आता मोहीम राहिलेली नसून गावचळवळ झाली आहे. कारंजा शहर स्वच्छ करणे, अशक्य कोटीचे काम आहे, असे म्हणणारे अनेक गावकरी आणि त्यांचे शेकडो हात आता शहर स्वच्छ करून सुंदर व निरोगी बनविण्याच्या कामाला चिकाटीने लागले आहे.
राऊत यांनी सर्वप्रथम नगराध्यक्ष व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविले. त्यानंतर दुकानांमध्ये होत असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर नियंत्रित करण्यासाठी प्लास्टिक वापरावर बंदी घातली. प्रसंगी अचानक दुकानांना भेटी देऊन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला, दंडात्मक कारवाईसुद्धा केली.
मोक्याच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालये, मूत्रिघरे बांधलीत. घर तेथे शौचालय ही योजना राबविली आणि कारंजा शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आणि वाटचाल केली. संपूर्ण कर्मचाºयांचे देखरेख पथक तयार करून शौचालयाचा वापर अनिवार्य केला.
दुकानदार व व्यावसायिकांनी दुकानातील कचरा थर्माकॉल, प्लास्टिक बाहेर उघड्यावर टाकू नये तर आपल्या दुकानासमोर ठेवलेल्या कचरा कुंड्यांत टाकण्याचा आग्रह धरला, विनंत्या केली आणि न ऐकणाºयांना आर्थिक दंडही ठोठावला. जागा सापडेल तेथे पोस्टर, बॅनर व फ्लेक्स लावून शहरांचे विद्रुपीकरण करणाºयांवर कारवाई करून नगरपंचायतीच्या परवानगीशिवाय बॅनर, पोस्टर लावता येणार नाही. परवानगी घेऊन लावणाºयांवरही कर आकारला. त्यामुळे नगरपंचायतीचे उत्पन्न वाढले. जनतेची असामाजिक, मानसिकता बदलवून जनतेला समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न कृतीतून केला जात आहे. नगराध्यक्ष कल्पना मस्के व उपाध्यक्ष दर्यापूरकर यांची त्यांना साथ आहे.
जुना बाजार चौकात असलेल्या जयस्तंभाचे सौंदर्यीकरण केले. या चौकातील अतिक्रमण हटवून संपूर्ण चौकात फ्लोअर टाईल लावून जुना बाजार चौक स्वच्छ आणि सुंदर केला. गावात प्ले ग्राऊंड नव्हते, त्यामुळे युवक, शाळकरी मुलांच्या शारीरिक विकासासाठी लाखो रूपये खर्चून ग्रीन जिम बनविला. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी म्हणून अद्ययावत व सुसज्ज अशी अभ्यासिका साकारली. संपूर्ण गावात सिमेंट रस्ते व नाल्या बनविण्याचा सपाटा लावला आहे.
व्यावसायिक परिसरात दिवसातून दोनदा, तर प्रत्येक वॉर्डात एकदा कचरा गाडी फिरवून कचरा गोळा करण्याची नागरिकांना सवय लावली. पंचायत समितीसमोरील मोकळ्या जागेत अतिक्रमणधारकांना व्यवसायासाठी गाळे बांधून जागा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एकंदरीत वर्षभर परिश्रमाने ग्रामस्वच्छता अभियान राबविले.
या स्वच्छता अभियानात सर्वात प्रथम मेहेरबाबा केंद्राच्या सेवकांनी प्रत्यक्ष भाग घेऊन साथ दिली. त्यानंतर शाळा, कॉलेजेस, गुरूदेव सेवामंडळ, डॉक्टर मंडळी, व्यापारी व युवक-युवती आणि संवेदना या सामाजिक संस्थेने या योजनेत स्वयंस्फूर्तपणे झोकून दिले. शनिवारी, १२ जानेवारीला शहरातील शाळा सहभागी होऊन महास्वच्छता अभियान राबविले जाणार आहे.
मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या अहोरात्र प्रयत्न व कल्पकतेमुळे कारंजाची स्वच्छता मोहीम आता मोहीम राहिली नसून जनचळवळ झाली आहे. कर्तबगार, कल्पक आणि सगळ्यांना सोबत घेवून सोबत चालणारा अधिकारी असला तर शासकीय योजना यशस्वीपणे राबविल्या जाऊ शकतात आणि गावाचा सहज कायापालट होऊ शकतो, शहरवासीयांना प्रत्यय येत आहे.

शहराचे पालटणार रूपडे
२ आॅक्टोबर २०१८, गांधीजयंतीपासून स्वच्छता अभियानावर विशेष लक्ष केंद्रित करून कारंजा शहराचा मुख्य परिसर आणि रस्ते आरशाप्रमाणे स्वच्छ करण्यात आले आहे. या १ जानेवारी २०१९ पासून स्वच्छता मोहिमेला विशेष गती देण्याचा नगरपंचायत, नागरिक आणि संस्थांनी चंग बांधला असून दररोज सकाळी नगरसेवक, कर्मचारी यांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबविले जात आहे. जनचळवळ झालेल्या स्वच्छता मोहिमेमुळे कारंजा शहराचे लवकरच रूपडे पालटणार आहे.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देत केले कौतुक
गोळा केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्र बांधले आहे. तेथे सुका व ओला कचरा वेगळा करून विल्हेवाट लावली जाते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनविण्यात येत आहे. गोळा झालेले टिनटपर, लोहा, लोखंड दारूच्या रिकाम्या बाटल्या विकून नगरपंचायतीला उत्पन्न मिळत आहे. या कचरा प्रक्रिया केंद्राला नुकतीच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देत नगरपंचायत, नगरसेवक व गावकºयांचे कौतुक केले.

Web Title: The 'cleanliness campaign' went on in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.