शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

पावसाळ्याच्या तोंडावर शहर कचऱ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक्या फळ-भाजीपाल्यावर जनावरे उच्छाद घालत आहे. मात्र, नगरपालिकेकडून नियमित कचऱ्याची उचल होत असल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देनगरपालिकेची डोळेझाक : विविध भागात अस्वच्छतेने गाठला कळस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळा तोंडावर असताना शहरातील विविध भाग आणि मार्गालगत अस्वच्छतेने कळस गाठला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव असतानाच साथीचे आजार बळावण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचा कानाडोळा आहे.पावसाळ्याचे नियोजन म्हणून नगरपालिकेच्या वतीने विविध भागातील नाल्यांची स्वच्छता केली. मात्र, लहान नाल्यांची स्वच्छता आणि विविध भागात असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला असल्याचे चित्र आहे. शहरातील महादेवपुरा, इतवारा बाजार, केसरीमल कन्या शाळा परिसर, न्यू हायस्कूल परिसर, सुदामपुरी, गांधीनगर, गजानननगर, आर्वी नाका, हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, गोंड प्लॉट, भामटीपुरा, कृष्णनगर, रामनगर, आदिवासी कॉलनी आदी ठिकाणी कित्येक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पडून आहेत. न्यू इंग्लिश हायस्कूल परिसरात पालिका संचालित लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या भिंतीलगतच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तसेच या मार्गावरील निरूपयोगी विहिरीला घाणीने विळखा घातलेला आहे. पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक्या फळ-भाजीपाल्यावर जनावरे उच्छाद घालत आहे. मात्र, नगरपालिकेकडून नियमित कचऱ्याची उचल होत असल्याचे दिसून येत नाही. कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असतानाच कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित नगरसेवक, नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे. शहरातील विविध भागात नगरपालिकेने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.फळ-भाजी विक्रेत्यांचा बेशिस्तपणाशहरातून जाणाऱ्या नागपूर मार्गालगत केसरीमल कन्या शाळेत अनेक भाजी-फळ विक्रेत्यांनी अस्थायी स्वरूपात रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत. हे व्यावसायिक दुकान बंद करतेवेळी सडकी भाजी आणि फळे केसरीमल कन्या शाळा परिसरात ठेवलेल्या कंटेनरमध्ये न टाकता रस्त्याच्या कडेला फेकतात. भाजी-फळविक्रेत्यांच्या या बेशिस्तपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. नगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस