शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अटीची पूर्तता करण्याकडे नागरिकांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:14 IST

भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रत्येक घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या आवारात वॉटर हार्वेस्टिंगचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, प्रभावी जनजागृतीअभावी हा विषय थंडबस्त्यात आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय जनजागृती मंचची मिळाली साथ : महत्त्व ओळखून पालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले क्रमप्राप्त

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रत्येक घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या आवारात वॉटर हार्वेस्टिंगचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, प्रभावी जनजागृतीअभावी हा विषय थंडबस्त्यात आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षीपासून वर्धा नगरपलिकेने बांधकाम परवानगी घेताना वॉटर हार्वेस्टिंग क्रमप्राप्त केले आहे.शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात जलसंकटाला सामोरे जावे लागल्याने यंदा वर्धा शहरातील अनेक नागरिकांनी वॉटर हार्वेस्टिंग घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठान परिसरात केले आहे. परंतु, त्याची नोंद नगरपालिकेने घेतली नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज असल्याने त्याबाबत वैद्यकीय जनजागृती मंच व वर्धा न.प.च्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. यंदा स्वत: नगराध्यक्षांनी या विषयी पुढाकार घेतला होता. त्यामुळे नवीन बांधकाम करणाऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग नकाशात नमूद नसल्यास त्यांना बांधकाम परवानगीच देण्यात आली नाही.ही वर्धा नगरपालिकेची भूमिका असली तरी कागदावर रेन वॉटर हार्वेस्टिंग दाखविणारे प्रत्यक्षात कृती करतात काय, याचीही शहानिशा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी केली पाहिजे, अशी अपेक्षा जल जागृतीसाठी काम करणाºयांना आहे.मालमत्ता करात मिळते २ टक्के सूटघर किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब केल्यास त्या मालमत्ता धारकाला मालमत्ता करात २ टक्के सूट दिली जात आहे. शिवाय प्रभावी जनजागृतीसाठी विविध सामाजिक संघटनांना सोबत घेतले जाईल. तर प्रत्यक्ष कृती न करणाºयांना भोगवटदार प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.- प्रदीप जगताप, मुख्याधिकारी, न.प.वर्धा.अन्यथा जलसंकटाला सामोरे जावे लागेलशहरात भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होतो. त्या तुलनेत जमिनीत पाणी जिरविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. मागील काही वर्षांत सर्वत्र सिमेंटीकरण झाल्याने जमिनीत नैसर्गिकरीत्या पाणी जिरणेदेखील बंद झाले आहे. याकरिता प्रत्येकाने पावसाचे पाणी बोअरवेल, विहिरींमध्ये सोडून पाणी पुनर्भरण करणे आज काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यात भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.- डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा.असे केले जाते जल पुनर्भरणपावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी घेता येते.

टॅग्स :Rainपाऊस