शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

घरकुलाच्या अंतिम यादीतून तीन गावांतील नागरिक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 5:00 AM

बैठकीमध्ये प्रपत्र ड घरकुल यादीसंदर्भात २६ ते ३० तारखेपर्यंत ग्रामसभेचे आयोजन करावे. त्यामध्ये पात्र यादी पात्र करून व अपात्र यादीलाही पात्र करून सर्व यादीला ग्रामसभेची मंजुरी घेऊन पंचायत समितीला पाठवावी. त्यानंतर लाभार्थी यांच्या काही तक्रारी असल्यास पंचायत समितीला कराव्या, पंचायत समिती स्तरावर कमिटी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : गटग्रामपंचायत मोहगावमधील रासा, केसलापार, वानरचुवा येथील कुटुंबीयांचे प्रशासनाच्या व तांत्रिक प्रणालीच्या ढिसाळ कारभारामुळे प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या ड परिपत्रक अंतिम यादीतून नावे वगळण्यात आली असून गरजू गरीब कुटुंबीयांचे हक्काचे घर हिरावून घेण्यात आले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून घरकुल योजनेपासून वंचित झालेल्या कुटुंबीयांचा पूर्ण समावेश करण्याची मागणी मोहगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे यांनी पालकमंत्री  आ. रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.२०१६ मध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना मिळण्यासाठी ग्रामपंचायत मोहगावने ग्रामसभेच्या माध्यमातून पाच गावांतील गरजू गरीब कुटुंबीयांच्या जवळपास २०७ कुटुंबांची नावे पाठवली होती. मात्र, यातील मोहगाव व तावी येथील ७२ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या ड परिपत्रक अंतिम यादीस पात्र ठरविण्यात आले आहे. तर, याच ग्रामपंचायतीमध्ये समावेश असलेल्या रासा, केसलापार, वानरचुवा या तीन गावांतील एकाही कुटुंबाला तसेच मोहगाव तावी येथील गरजूंना खोटे कारण दाखवून घरकुल योजनेच्या ड परिपत्रक अंतिम यादीत स्थान देण्यात आले नसून सर्वांना अपात्र ठरविण्यात आले आहे.  येथील नागरिकांची घरे मोठ्या प्रमाणात जुनी मातीची, कुडाची आहेत. रासा, वानरचुवा, केसलापार येथील नागरिकांना घरांची अत्यंत आवश्यकता असताना या तिन्ही गावांना प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या ड परिपत्रक अंतिम यादीतून वगळण्यात आले आहे. या अपात्र ठरवण्यात आलेल्या  लाभार्थ्यांच्या अपात्रतेचे कारण दोन घरे असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडे एक साधं पक्कं घर नाही. त्यांच्याकडे कुठून दोन घरे दाखविण्यात आली आहेत. तर, काहींच्या घरी साधी दुचाकी नसतानासुद्धा व चारचाकी, तीनचाकी वाहने, फ्रीज, टीव्ही हे दाखवण्यात आले आहे. हे सर्वेक्षण कोणी आणि कसे केले व झालेल्या तांत्रिक गडबडीची सखोल चौकशी करून वंचित लाभार्थ्यांना लाभ द्यावा अशी मागणी नवघरे यांनी केली आहे.

घरकुलाचा प्रश्न निघणार निकाली- आर्वी - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्यासोबत घरकुल यादीबाबत सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांच्यासह पदाधिकारी व जि. प. कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रपत्र ड घरकुल यादीसंदर्भात २६ ते ३० तारखेपर्यंत ग्रामसभेचे आयोजन करावे. त्यामध्ये पात्र यादी पात्र करून व अपात्र यादीलाही पात्र करून सर्व यादीला ग्रामसभेची मंजुरी घेऊन पंचायत समितीला पाठवावी. त्यानंतर लाभार्थी यांच्या काही तक्रारी असल्यास पंचायत समितीला कराव्या, पंचायत समिती स्तरावर कमिटी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. ती कमिटी प्रत्यक्ष भेटी देऊन पात्र-अपात्र लाभार्थी ठरवतील, असे चर्चेअंती ठरविण्यात आले आहे. 

- आयसीआयसीआय या बँकेचे १५ वा वित्त आयोगाचे खाते काढण्याबाबत चर्चा झाली.  प्रायव्हेट बँकेना आरबीआय जबाबदार राहत नाही. आता आपले खाते राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये आहे. तेच योग्य आहे, आपल्या ग्रामपंचायतचा पैसा सुरक्षित आहे. प्रदेश संघटनेची या विषयावर शासनाशी बोलणी सुरू आहे. महत्त्वाचा प्रश्न असा की जिल्ह्यामध्ये आयसीआयसीआय बँकेच्या तीनच शाखा आहे. त्यामुळे ही बँक आपल्याला प्रत्येक तालुक्यावर कोणत्याही प्रकारची सेवा देऊ शकणार नाही. 

- यासाठी शासनपण जबाबदार राहाणार नाही. असे  सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांनी सांगितले. बैठकीला रेणुका कोटबंकर, वर्धा तालुका अध्यक्ष प्रतिभा माऊसकर, वर्धा तालुका सचिव सुजाता पांडे ,आर्वी तालुका अध्यक्ष देवेंद्र बोके, आष्टी तालुकाध्यक्ष अंकिता पावडे ,प्रशांत कठाणे, प्रवीण ठाकरे सरपंच शेंडे सरोज गावंडे ,हिंगणघाट तालुका अध्यक्ष अनिल बुरीले, जिल्हा सचिव गावंडे ,किशोर नवले, जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बोंबले उपस्थित होते. 

  रासा, केसलापार, वानरचुवा येथील कुटुंबीयांनी त्यांना या योजनेतून हक्काचे घर मिळावे, यासाठी अर्ज केले होते आणि आता घर मि‌ेळेल, अशी अपेक्षा बाळगून असतानाच प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या ड परिपत्रक अंतिम यादीत या तिन्ही गावांतील एकाही कुटुंबाचा समावेश नाही तसेच मोहगाव व तावी येथील गरजूंनासुद्धा वगळण्यात आले आहे. यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.विलास नवघरे, सरपंच मोहगाव 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना