लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरामध्ये बसस्थानक व रेल्वेस्थानक वगळता, अन्य कुठेही वाहनतळ सुरू नाही. त्यामुळे वाहन चालक आपले वाहन कुठेही उभे करून तासनतास गायब राहतात. याचा त्रास मात्र नागरिकांना सोसावा लागत आहे. मात्र, बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात नियमानुसार पैसे घेतले जात असल्याने तक्रारी नाहीत.
काही महिन्यांआधी रेल्वे स्थानक येथील वाहनतळ संचालकाच्या तक्रारी होत्या; परंतु तक्रार कोणाकडे करायची, याची कल्पना नागरिकांना नसल्याने काही वाद निर्माण होतात.
नागरिकांनी काय करावे ?
- अधिकृत पावती घ्या : वाहनतळावर पार्किंग करताना अधिकृत पावती घ्या. बसस्थानकावर दिली जाते.
- नगरपालिकेची हेल्पलाइन नाही: शहरात पार्किंग व्यवस्था नसल्याने नगरपालिकेकडे हेल्पलाईन नाही. बसस्थानक, रेल्वे स्थानक प्रशासनाकडे अन्याय झाल्यास तक्रार नोंदविता येते.
- जादा शुल्क आकारल्यास तक्रार नोंदवा : जादा शुल्क आकारण्यात येत असल्यास संबधितांकडे तक्रार करा
कारणे काय?
- नगरपालिकेचे दुर्लक्ष : शहरातील रस्त्यांवर वाहने पार्किंग केली जात असताना नगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना राबविण्यात येत नाही.
- टोईंगमुळेही मोठी डोकेदुखी : रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात कुठेही वाहन उभे दिसल्यास वाहतूक विभागाकडून टोईंग वाहनाद्वारे वाहन पोलिस ठाण्यात नेल्या जाते.
- ठाकरे मार्केटच्या पार्किंगचे भिजत घोंगडे : शहरात काही वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या ठाकरे मार्केट परिसरात वाहनतळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नेमके घोडे अडले कुठे, हे कोणालाच माहिती नाही.
वर्धा रेल्वे स्टेशन वाहनतळअधिकृत शुल्क : २० तासालारेल्वे स्थानकावर असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी तासाला २० रुपये घेण्यात येतात. तासापेक्षा जास्त किंवा दिवसभर वाहन ठेवायचे असल्यास अतिरिक्त चार्ज घेतला जातो.
बसस्थानक वाहनतळअधिकृत शुल्क : २० रुपये तासाला बसस्थानकावर असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी तासाला २० रुपये घेण्यात येतात. तासापेक्षा जास्त किंवा दिवसभर वाहन ठेवायचे असल्यास अतिरिक्त चार्ज घेतला जातो.