अपघाताचा धोका : ठेकेदाराची पोकलँड मशीन जप्तसमुद्रपूर : स्थानिक वॉर्ड क्र. ३ मध्ये पंचायत समिती सदस्य डॉ. चेतना खुजे यांच्या फंडातून २ लाख १५ हजार ६१६ रुपये प्राकलन किमंतीच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु या कामावर स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतल्यामुळे सदर काम बदावस्थेत आहे. बंद कामामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.सदर रस्त्याच्या बाजूला मोठमोठया खोल नाल्या खोदण्यात आल्या आहेत. रात्रीला सदर नाली दिसून पडत नसल्याने जनावरे व लहान मुले यात पडून अपघातग्रस्त होण्याची शक्यता व्यक्त भोत आहे. काम करणाऱ्या ठेकेदाराची पोकलँड मशीन तहसीलदारांनी जप्त केली असून ती सध्या तहसील कार्यालयात लावण्यात आली आहे. प्रशासनाने या रस्त्याच्या बांधकामाचा तिढा सोडवावा आणि तोपर्यंत रस्त्यावर ये-जा करण्याकरिता रस्ता सपाट करावा अशी मागणी नागरिकांची केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
बंद कामामुळे नागरिक त्रस्त
By admin | Updated: October 8, 2015 01:56 IST