शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तपत्या उन्हात जिल्हाकचेरीत घोटभर थंड पाणी नागरिकांना मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

कार्यालयीन दिवसांत भोजन अवकाशाचा वेळ वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयालयाचे कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपआपल्या घरून बाटलीत पिण्याचे थंड पाणी आणतात. पण, जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अल्पावधीतच हे थंड पाणी गरम होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच उष्माघात टाळण्यासाठी वारंवार भरपूर पाणी पिण्यासह काही मार्गदर्शक सूचना  जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना  देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे काय? याबाबत ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केली असता जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या दिवसांतच जिल्हा कचेरीत घुटभर थंड पाणी नागरिकांना मिळत नसल्याचे दिसून आले.

कर्मचारी घरून शिशीत आणतात पिण्याचे पाणी-    कार्यालयीन दिवसांत भोजन अवकाशाचा वेळ वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयालयाचे कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपआपल्या घरून बाटलीत पिण्याचे थंड पाणी आणतात. पण, जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अल्पावधीतच हे थंड पाणी गरम होते. परिणामी, नाइलाजाने या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत घशाला कोरड पडल्यावर गरम पाणीच प्यावे लागत आहे.

स्वच्छतागृहाशेजारील वॉटर कूलर ठरतोय शोभेची वस्तू -   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाजूला एक वॉटर कूलर आहे. या वॉटर कूलरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर असलेल्या टाकीतील पाणी येते. हे वॉटर कूलर सुरू असले तरी पाणी थंड होत नाही. इतकेच नव्हेतर, हे वॉटर कूलर महिला आणि पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाच्या शेजारीच असल्याने अनेक व्यक्ती या वॉटर कूलरमधील पाण्याचा वापर हात धुण्यासाठी करीत असल्याने हे पाणी कसे प्यावे, असा विचार करतात.

कुंडीतील रोपटेही करपले-    जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर कुंड्यांमध्ये विविध प्रजातीची झाडे लावली आहे. पण जिल्हाधिकारी यांच्या स्वीयसहाय्यक यांच्या दालनाच्या शेजारील स्वच्छतागृहा जवळील कुंडीतील रोपटेच पाण्याअभावी करपल्याचे वास्तव आहे. तर याच भागात काहींनी खर्रा व पान थुंकून भिंतीच रंगविल्या आहेत.तोंड दाबून बुक्क्यांचा मार?-    जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने सध्या येथील कर्मचाऱ्यांना जीवाची काहिली होणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांत गरम पाणीच प्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांचे हे धोरण तोंड दाबून बुक्क्यांचा मारच, अशी चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये रंगत आहे.पाण्यासाठी वृद्धांना चढाव्या लागतात पायऱ्या-    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारातीत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील व उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आहे. तहसील व उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या निराधार व वृद्धांना घशाला कोरड पडल्यावर ग्लासभर पाण्यासाठी पायऱ्या चढत पहिल्या मजल्यावर जावे लागते. पण,   स्वच्छतागृहाशेजारील वॉटर कूलरमधील पाणीच थंड होत नसल्याने गरम पाणी पिऊनच या व्यक्तींना आपली तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

वयोवृद्ध मोडताहेत बोटे-    जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक येतात. यात वयोवृद्धांसह महिलांचाही समावेश असतो. घशाला कोरड पडल्यावर वयोवृद्धांसह महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर अनेकांना जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाशेजारील वॉटर कूलरमधील गरम पाणी सेवन करून अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

 

टॅग्स :Waterपाणी