शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनो ५० हजारांवर रोकड बाळगताय, सावधान ! पोलिसांकडून तपासणी होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 17:49 IST

पोलिस चौकशी करणार : पैसे कोठून आले याचे पुरावे द्यावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : दिवाळी आहे, कपडे, सोने-नाणे खरेदी करण्यासाठी तुम्ही बाजारपेठेकडे निघाल. तुमच्याकडे ५० हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम असेल तर सावधान. तुमचे वाहन पोलिस नाक्यावर अडवतील, तपासणी होईल. रोख रक्कम आढळली तर तुम्हाला ती कोठून आली, याचे पुरावे द्यावे लागतील. पोलिसांचे समाधान झाले तर तुम्हाला सोडले जाईल, अन्यथा तुमची रक्कम जप्त करून त्यावर सुनावणी सुरू होईल.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आचारसंहिता लागू आहे. या काळात आर्थिक उलाढालीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाचे संपूर्ण लक्ष राहणार णार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे लोकांनी या गोष्टी समजून घ्याव्यात, नियम समजून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. तुम्ही अधिकाधिक ऑनलाइन व्यवहार करावेत. तुम्ही दिवाळीच्या खरेदीसाठी येत आहात आणि तुमच्याकडे रोख रक्कम आहे. तर ती कोठून आणली, याबाबतचे पुरावे जरूर सोबत ठेवावेत. जसे की, बँकेतून रक्कम काढली असेल तर पासबुक सोबत बाळगावे. दूध डेअरीचे बिल आले असेल तर त्याची पावती सोबत असावी. शेतमाल विकला असेल तर व्यापाऱ्याची पावती सोबत ठेवावी. काहीच सोबत नसेल तर किमान ते पैसे तुमचे कष्टाचेच आहेत हे सिद्धच करावे लागेल. जर सिद्ध करता आले नाही तर मात्र ती रक्कम जप्त केली जाईल. त्याची पावती दिली जाईल आणि त्यावर सुनावणी चालेल. पुढील एका आठवड्यात सुनावणीवर निर्णय घेतला जाईल. दिवाळीनिमित्त खरेदी हमखास असते. आता एक तोळा सोने घ्यायचे, तर ७० हजार रुपये लागतात. शेतकरी कुटुंबाकडे असणाऱ्या रोख रकमेला पावत्या कोठून आणायच्या, हा प्रश्न असतो. त्यामुळे दिवाळी खरेदीची अनेकांची पंचाईत होणार आहे. सामान्यांना आम्ही त्रास देणार नाही, शंका आली तर मात्र कायदेशीर कार्यवाही अटळ असेल, असे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

कॅमेऱ्यांसमोर होणार वाहनांची तपासणी तालुक्यात चार ठिकाणी पोलिसांनी चेकनाके उभे केले आहेत. वणी, मारेगाव व झरी तालुक्याच्या हद्दीत हे नाके आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तेथे कॅमेऱ्यांसमोर वाहनांची तपासणी होणार आहे. शिवाय, अन्यत्र तपासणी व चौकशी होत असताना एक कॅमेरामन पोलिसांसोबत असेल. तो त्या घडामोडी कॅमेराबद्ध करणार आहे.  

टॅग्स :YavatmalयवतमाळCode of conductआचारसंहिता