वर्ध्यात चिन्ना बारींनी फडकावला होता तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:36+5:30

लोकांनी अनेक राज्यात पर्यायी व्यवस्था स्थापून अनेक गाव व शहरामध्ये पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पोलीस ठाणे व शासकीय इमारतींवर सत्ता काबीज केली. देशातील अनेक जिल्ह्यात सरकारी इमारती व जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंगा चढवून ध्वजारोहण करण्यात आले.

Chinna Bari had waved the tricolor in Wardha | वर्ध्यात चिन्ना बारींनी फडकावला होता तिरंगा

वर्ध्यात चिन्ना बारींनी फडकावला होता तिरंगा

Next
ठळक मुद्देऑगस्ट क्रांतिदिन विशेष । वयोवृद्ध नामदेवरावांनी जागविल्या स्मृती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशात स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन चिघळले असतानाच वर्ध्यात चिन्ना बारी यांनी आपल्या सवंगड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर चढत तिरंगा फडकावला. ९ ऑगस्ट रोजी वर्ध्यात ही अनोखी क्रांती घडली. या क्रांतिदिनाच्या स्मृतींना ज्येष्ठ नागरिक नामदेवराव गुजरकर यांनी उजाळा दिला.
महात्मा गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ मध्ये ब्रिटिशांना भारतातून चालते व्हा, असे खडसावत देशवासीयांना करा किंवा मरा, असे सांगितले. मात्र, ब्रिटिशांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू व इतर ज्येष्ठ नेत्यांना कारागृहात टाकले. दुसरी फळी जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, सुचेता कृपलानी, अरुणा असफली, उषा मेहता आदी नेत्यांनी भूमिगत होऊन गावागावांत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात करा किंवा मरा या मोहिमेद्वारे जागृती केली. ९ ऑगस्ट १९४२ ला पहाटेपासूनच विद्यार्थी, युवक, महिला, व्यापारी, कामगार आदी सर्वांनी रेल्वेगाड्या बंद पाडल्या. टेलिग्राफ टॉवर पाडण्यात आले. प्रक्षुब्ध लोकांनी बँक, ट्रेझरी, पोलीस चौक्यावर धावा बोलून ताब्यात घेतल्या. ब्रिटिश अधिकाऱ्यांची कार्यालये, त्यांची संपत्तीही हस्तगत केली. सातत आत-आठ दिवस सेशात ही मोहीम सुरू होती. ब्रिटिशांनी पोलीस व सैन्याचा वापर करून लाखो लोकांना कारागृहात डांबले. ऑपरेशन बोल्टनुसार भारतात सर्व ठिकाणी गोळीबार केला. यात १० हजार सैनिक शहीद झाले. संपूर्ण देशातील वातावरण विस्कळीत झाले.
लोकांनी अनेक राज्यात पर्यायी व्यवस्था स्थापून अनेक गाव व शहरामध्ये पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पोलीस ठाणे व शासकीय इमारतींवर सत्ता काबीज केली. देशातील अनेक जिल्ह्यात सरकारी इमारती व जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंगा चढवून ध्वजारोहण करण्यात आले. वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस चिन्ना बारी व त्याच्या तीन-चार सवंगड्यांनी सैन्य आणि पोलिसांची नजर चुकवून लोखंडी खांबावर चढत तिरंगा फडकाविला, ‘भारत माता की जय’ म्हणत हे सर्व जण पसार झाले. या युवकांच्या आवाजाने सैनिकांनी बाहेर येऊन पाहिले तेव्हा तिरंगा झेंडा फडकलेला दिसला. यावरूनच बाजारपेठेकडे जाणाºया एका मार्गाचे ‘चिण्णा बारी मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. वयोवृद्ध नामदेवराव गुजरकर यांनी ‘लोकमत’कडे क्रांतिदिनाच्या या स्मृतींना उजाळा दिला.

Web Title: Chinna Bari had waved the tricolor in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.