शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूचे प्रकरण पोलिसांनी दडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:24 IST

तालुक्यातील मदनी येथे हरिलाल चव्हाण यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात सुभाष वानखेडे यांच्या मंडप डेकोरेशन साहित्यातील डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मुलगा शंकर गजानन जाधव (२४) रा. मदनी याचा ५ जून रोजी मृत्यू झाला.

ठळक मुद्देआई विमल जाधव यांचा आरोप। चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील मदनी येथे हरिलाल चव्हाण यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात सुभाष वानखेडे यांच्या मंडप डेकोरेशन साहित्यातील डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मुलगा शंकर गजानन जाधव (२४) रा. मदनी याचा ५ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणाचा सेवाग्राम पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही, हे प्रकरण दडपले, अशी तक्रार मृताची आई विमल गजानन जाधव यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.याप्रकरणी योग्य तपास करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे व आपल्या मुलाच्या मृत्यूची जबाबदारी म्हणून आपल्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शंकर गजानन जाधव हा ५ जून रोजी हरिलाल चव्हाण यांच्या घरी लग्न कार्यासाठी डेकोरेशन कंत्राटदार सुभाष वानखेडे यांच्यासोबत गेला होता. रात्री ९.३० वाजतादरम्यान डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी सेवाग्राम पोलिसांनी गावात येऊन चौकशी केली. यावेळी सदर डीजे वायर काढून पोलीस ठाण्यात नेला; मात्र नंतर संबंधिताला परत करण्यात आला. या प्रकरणात मातेचे बयाण नोंदवून घेण्यात आले नाही. पोलिसांनी परस्पर मुलाचा मृत्यू हृदयविकाराने झाला, अशी खोटी अशी माहिती नोंदविली. हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे, असे विमल जाधव यांनी या निवेदनात म्हटले आहे. मुलाच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विमल जाधव यांनी केली आहे. या प्रकरणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून दाद मागणार असल्याचेही विमल जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस