शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मुले म्हणतात; आम्ही करतो समर जॉब

By admin | Updated: June 4, 2014 23:56 IST

बेरोजगारी वाढली असल्याने युवा वर्गाची मनस्थिती कुणापासूनही लपलेली नाही. अनेक तरुण उन्हाळ्यात लहानसहान कामे करताना दिसतात. यात वेगळे असे काहीच नसताना १६ वर्षांच्या आतील लहान मुलेही

बालमजुरी मात्र वास्तव : पैसे हाती येताच जडतात अनेक सवयीपराग मगर - वर्धाबेरोजगारी वाढली असल्याने युवा वर्गाची मनस्थिती कुणापासूनही लपलेली नाही. अनेक तरुण उन्हाळ्यात लहानसहान कामे करताना दिसतात. यात वेगळे असे काहीच नसताना १६ वर्षांच्या आतील लहान मुलेही आता कामांच्या मागे लागली आहेत. त्यांनी या कामाला ‘समर जॉब’ असे गोंडस नाव दिले आहे. सध्या शहरात फेरफटका मारल्यास कुठल्याही रस्त्यावरील दुकानात आंबे विकताना, माठ विकताना, तसेच उन्हाळ्यातील वस्तू विकताना वडिलांनासह लहान मुले नजरेस पडतात. कधी काळी वडील नसताना ही मुलेही व्यवस्थित दुकान सांभाळतांना त्यांचा आत्मविश्‍वास वाखाणण्याजोगा आहे. उन्हाळ्यात सर्वांना सुट्टय़ा असतात. अशावेळी गावासह शहरातील अनेक मुले केवळ संगणकांवर खेळताना वा कार्टून पाहताना दिसतात; पण ही एकच बाजू खरी आहे असे नाही, तर शहराचा, गावांचा फिरस्ता घेतला असता अनेक मुले आपला वेळ वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करताना दिसतात. नजीकच्या पवनार येथे आपले छोटेखानी चपला शिवण्याचे दुकान थाटून बसलेला रोहित यासंदर्भात सांगतो की यंदा मी दहावीला गेलो आहे. शिक्षणासाठी पैसा लागतोच. काय कारावे हा प्रश्न होताच. घरी चपला शिवण्याचा व्यवसाय असल्याने ती कला अवगत होतीच. म्हणून सरळ चपला शिवण्याचे दुकान सुरू केले. सोबत काही चपलाही विकायला ठेवल्या. दिवसभरात ४0-५0 रुपयांची कमाई होऊन जाते. सध्या लग्नाचा सिझन सुरू असल्याने कमाई जास्त होते. हे सर्व सांगत असताना सोबत सहज तो चपलाही शिवत असतो. हे काम आता सवईचे झाल्याचे तो सांगतो. पण शाळा सुरू झाल्यावर काय असे विचारले असता पुढचं पुढे बघू अस सांगत हसून तो वेळ मारून नेतो. शहरात आंब्याचा व्यवसाय करीत असलेल्या एका विक्रेत्याच्या लहान मुलाला आंबे विकताना विचारले असता तो म्हणतो की घरी तेच तेच कार्टून पाहून किंवा तोच उद्योग करून कंटाळा येत होता. म्हणून वडिलांजवळ हट्ट करून मी आंबे विकायला सोबत आलो. आंबे विकणे हा उद्देश नव्हता तर बाबांसोबत मार्केटमध्ये येणे हा उद्देश होता. आधी केवळ गंमत म्हणून चारचाकीवर बसायचो. वडील थोडे दूर झाडाखाली इतरांशी गप्पा मारत असायचे. आधी रस्त्याकरून जात असलेल्या गाड्यांकडेच जास्त लक्ष जात असे.  कुणी विचारले की लगेच भाव सांगून मोकळं व्हायचो. हळूहळू आंबे विकण्यात मजा वाटायला लागली. वडील कधी कधी हातगाडीवर बसवून माल आणायला जायचे. अशावेळी दुकानात मी एकटाच असायचो. सुरुवातीला आंबे विकताना भीती वाटायची. आता मी त्यातले सर्व बारकवे शिकत असल्याचे छोटू म्हणतो.