शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

अध्यक्ष नितीन मडावी तर उपाध्यक्ष कांचन नांदुरकर

By admin | Updated: March 22, 2017 00:36 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिले. यामुळे भाजपाला युतीची गरज भासली नाही.

जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा : भाजपाला राकाँचा तर काँग्रेसला अपक्षाचा पाठिंबा वर्धा : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिले. यामुळे भाजपाला युतीची गरज भासली नाही. अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या अध्यक्षपदाची माळ भाजप कोणाच्या गळ्यात घालते, याकडे जनतेचे लक्ष होते. मंगळवारी ही उत्सुकता संपली. अध्यक्षपदी भाजपाचे सावली (वाघ) गटाचे सदस्य नितीन रामचंद्र मडावी तर उपाध्यक्ष पदावर भाजपच्याच जळगाव(बेलोरा) गटाच्या सदस्य कांचन प्रल्हाद नांदुरकर यांची बहुमताने वर्णी लागली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज पार पडलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजप व रिपाइं युतीचे नितीन मडावी व उपाध्यक्षपदी कांचन नांदुरकर यांनी प्रत्येकी ३४ मते घेऊन विजय संपादन केला. भाजपाचे ३१ व रिपाइंचा एकसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनीही भाजपालाच मतदान केले. सेनेचे दोन सदस्य गैरहजर होते. बसपाने सभागृहात तटस्थची भूमिका घेतली. सतत काँग्रेसचा गड असलेल्या वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपने पहिल्यांदाच बहुमतात सत्ता स्थापन केली. यापूर्वी दोनदा बहुतमाचे गणित जुळवत भाजपने सत्ता काबीज केली होती. शांततेत प्रक्रिया पार पडली. सकाळी १० ते १२ या कालावधीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता अर्ज स्वीकारण्यात आले. स्पष्ट बहुमत असल्याने ही पदे भाजपाकडेच जाणार हे निश्चित होते. काँगे्रसनेही अध्यक्षासाठी सुमित्रा मलघाम तर उपाध्यक्ष पदाकरिता त्रिलोकचंद कोहळे यांची उमेदवारी दाखल केली होती. भाजपकडून अध्यक्ष पदाकरिता नितीन मडावी तर उपाध्यक्ष पदाकरिता कांचन नांदुरकर यांनी अर्ज केले. दुपारी २ वाजता निवडणुकीची विशेष सभा झाली. यात हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये भाजपचे अध्यक्षपदाचे मडावी यांनी काँग्रेसच्या मलघाम यांचा २० मतांनी पराभव करुन विजय संपादन केला. उपाध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार नांदुरकर यांनीही काँग्रेसचे उमेदवार कोहळे यांचा २० मतांनी पराभव करीत विजय संपादन केला. भाजपच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३४ मते मिळाली. काँगे्रसच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी १४ मतांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसला एका अपक्षाची साथ मिळाली. ५२ सदस्यीय वर्धा जिल्हा परिषदेमध्ये भाजप ३१ व रिपाइं (आ.) १, काँग्रेस १३, राकाँ, शिवसेना व बसपा प्रत्येकी २ तसेच अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. घोषणा होताच च खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर व माजी आमदार दादाराव केचे यांनी कार्यकर्यांसह जिल्हा परिषद गाठली. सभेदरम्यान सर्व लोकप्रतिनिधी अध्यक्षाच्या कक्षामध्ये स्थानापन्न होते. काँगे्रस, अपक्ष व बसपाचे सदस्य सभेत अगदी वेळेवर उपस्थित झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, सहायक म्हणून उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, उपजिल्हाधिकारी(निवडणूक) लोणकर व कर्मचारी उपस्थित होते. सभेला आठही पं. स. सभापती उपस्थित होते.(कार्यालय/शहर प्रतिनिधी) शिवसेना गैरहजर तर बसपा तटस्थ अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या विशेष सभेत शिवसेनेचे जि.प. सदस्य जयश्री चौके व महेश गौर हे गैरहजर राहिले. शिवाय बहुजन समाज पक्षाचे उमेश जिंदे आणि मनीष पुसाटे यांनी तटस्थ राहणे पसंत केले. काँगे्रससह एका अपक्षाने निवड प्रक्रियेत सहभागी होत काँगे्रसच्या उमेदवाराला मतदान केले. भाजप सदस्यांचा ड्रेसकोड लक्षवेधक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या विशेष सभेकरिता भाजपाकडून विशेष पेहराव निश्चित करण्यात आला होता. यात महिला सदस्य दोन प्रकारच्या एकाच रंगाच्या साड्या परिधान करुन सभागृहात दाखल झाल्या. सदर साड्या भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी उपलब्ध करुन दिल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. शिवाय पुरूष जि.प. सदस्यांकरिता पांढरे शर्ट, पॅन्ट आणि महिलांसह सर्वांना भगवे फेटे बांधण्यात आले होते. भाजपाच्या महिला पं.स. सभापतींकरिताही आकाशी रंगाच्या साड्या व भगवे फेटे हा पेहराव ठेवण्यात आला होता.